ETV Bharat / bharat

सावधान! तुम्ही प्लास्टिक खाताय... आठवड्याला ५० ग्रॅम, महिन्याला २५० ग्रॅम

author img

By

Published : Jun 28, 2019, 2:22 PM IST

Updated : Jun 28, 2019, 3:00 PM IST

प्लास्टिकचा बिनदिक्कतपणे वापर हा आपल्या शरिराला अपायकारक ठरत आहेत. अभ्यासानुसार मनुष्य दर आठवड्यात 50 ग्रॅम प्लास्टिक वापरत आहेत. तर दर महिन्याला सुमारे 250 ग्रॅम प्लास्टिक वापरत आहे.

प्लास्टिक

हैदराबाद - प्लास्टिकचा करण्यात येणारा मोठ्या प्रमाणात वापर हा आपल्या शरिराला अपायकारक ठरत आहे. अभ्यासानुसार, आठवड्यात 50 ग्रॅम तर, महिन्याला सुमारे 250 ग्रॅम प्लास्टिक मनुष्याचे शरिरात जात आहे. प्लास्टिकचा वाढता वापर हा मानवी आरोग्यासाठीही धोकादायक आहे.

प्लास्टिकच्या बॉटलमध्ये असलेल्या पाण्यात प्लास्टिकचे सुक्ष्म कण आपोआप पाण्यात मिसळतात. हे सुक्ष्म प्लास्टिक पाण्यातून आपल्या शरीरात जात आहे. याचबरोबर मासे, मीठ यांच्या माध्यमातून देखील प्लास्टिक आपल्या शरीरात जात आहे. तसेच धुळीच्या माध्यमातूनही प्लास्टिकचे सुक्ष्म कण आपल्या शरीरात जात असल्याचे ऑस्ट्रेलियातील न्यू कॅसल विद्यापीठातील संशोधकांन आपल्या अभ्यासात आढळले आहे.

तुम्हाला हे माहीती आहे का?

  • मागील २ दशकात प्लास्टिकच्या उत्पादनात बेसुमार वाढ झाली आहे.
  • ग्रँड व्ह्यू रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार, प्लास्टिक उद्योग हा 2025 पर्यंत 4 टक्क्याने वाढेल.
  • उत्पादन क्षेत्र, उद्योग आणि 3 डी प्रिंटिंगमध्ये मायक्रो प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
  • उत्पादित केलेले 75% पेक्षा अधिक प्लास्टिक हे नॉन-बायोडिग्रेडेबल कचऱ्यात बदलत आहे.
  • दरवर्षी सुमारे 10 कोटी टन प्लास्टिक निर्माण होत असून प्रतिवर्षी 24 लाख टन प्लास्टिक समुद्र, नद्यांमध्ये मिसळत आहे.

प्लास्टिकचा वापर कसा कमी करता येईल?

  • प्लास्टिक पिशव्या आणि बाटल्यांचा वापर करू नका.
  • कापडी पिशव्या वापरा.
  • आपल्या घरामध्ये धूळ साचु देऊ नका.
  • शक्य तेवढे, शुद्ध मीठ वापरावे आणि दूषित पाणी पिऊ नये.

प्लास्टिक मनुष्याच्या शरीरात कसे जाते?

समुद्र आणि इतर जलस्त्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळत आहे. हे प्लास्टिकचे लहाण तुकडे मासे खातात. मानवी अन्न साखळीच्या माध्यमातून प्लास्टिक मनुष्याच्या शरीरात जाते. सूक्ष्म प्लास्टिक देखील सागरी मीठांचाच एक भाग बनले आहे. आपण समुद्री मीठ वापरतो तेव्हा काही प्लास्टिकचे कण आपल्या शरीरात प्रवेश करतात.

प्लास्टिक हा एक गंभीर धोका -

प्लास्टिक केवळ महासागर आणि इतर पाण्याचे स्त्रोत दूषित करीत नाही. तर यामुळे मानवी आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. प्लास्टिकला आपल्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आपण प्लास्टिक वापरणे बंद करायला हवे.

प्लास्टिक प्रदूषण -

शास्त्रज्ञांनी न गंजणारी, वजनाने हलकी अशी आणि टिकाऊ वस्तू म्हणजे ‘प्लास्टिक’ हा पदार्थ बनवला खरा; मात्र त्याचे विघटन होत नसल्याने ते नष्ट करता येत नाही. त्यामुळे प्रदूषण होते. परत वापरात न आणता येणारे प्लास्टिकचे पदार्थ टाकायचे कुठे आणि त्यांची विल्हेवाट लावायची कशी, ही समस्या जगभर चर्चिली जात आहे. प्लास्टिक उद्योगातून लक्षावधी लोकांना रोजगार मिळाला आहे, तरीही केवळ रोजगार निर्मितीचे साधन आहे, म्हणून प्लास्टिकचा वापर चालू ठेवणे धोकादायक ठरेल.

राज्यात २३ जुनपासून प्लास्टिक बंदी -

कोणत्या प्लास्टिकवर बंदी?

सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या (यात मायक्रॉन, साईजच्या मर्यादा नाहीत), चहाचे कप, सरबतचे ग्लास, थर्माकोल ग्लास, डेकोरेसन थर्माकोल, हॉटेलमध्ये पार्सलसाठी वापरण्यात येणारं प्लास्टिक (डब्बे, चमच, पिशवी), फरसाण, नमकीन यांसाठची पदार्थांची आवरणं (यात उत्पादक कंपन्या पॅकिंगसाठी वापरणाऱ्या प्लास्टिकचा यात समावेश नाही).

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jun 28, 2019, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.