गुंटूर - कुष्ठरोग्यांना आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना स्पर्श करण्याचं धाडस कोणी करत नव्हतं. या हातांवर भिक्षा मागण्याची वेळ आली होती. मात्र, आता याच हातांनी तयार केलेल्या वस्तू परदेशात निर्यात केल्या जात आहेत.
गुंटूर जिल्ह्यातील बापटला इथे 1960 साली सल मिशन आर्मी या संस्थेने कुष्ठ रोग्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली. ही सेवा मिळवण्यासाठी देशाच्या विविध भागातून कुष्ठरोगी गुंटूर इथे येत. समाजानं टाकलेल्या या लोकांनी बापटलामध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि जगण्यासाठी भीक मागण्यास सुरवात केली.
त्यांच्या अडचणी लक्षात सरकारनं 1985 मध्ये त्यांच्यासाठी घरं बांधली. त्यांचा घरांचा परिसर हा बेथानी म्हणून ओळखला जाऊ लागला. सुरवातीला उदरनिर्वाहासाठी त्यांची मुलेही भीक मागू लागली. त्यांच्या जिवनात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने बेथानी कॉलनी कुष्ठरोगी संघानं महिला आणि मुलींना विणकामाचं प्रशिक्षण देण्यास सुरवात केली.
बाईनाम्मा नावाच्या महिलने जवळजवळ 200 कुष्ठरोगी रुग्णांचा जगण्याचा संघर्ष पाहिला. कुष्ठरोग्यांना त्यांच्या मुलांना शिक्षण देताना येणाऱ्या अडचणी बोयीनाम्मा यांच्या लक्षात आल्या. तेव्हा त्यांनी पुनर्वसन केंद्र स्थापन केले आणि तिथे 100 ते 150 सदस्यांना बेड गद्दे बनवण्यासाठी साहित्य दिलं. सध्या या केंद्रात 15 टेलर कार्यरत आहेत. आमच्यातील बरेच जण आता निवृत्त झाले असून त्यांची मुले आता ही काम करत आहेत, असे संस्थेत काम करणारे कर्मचारी मिरावली यांनी सांगितले.
महिलांनी बॅग, बेडशीट अशा वस्तूंचं विणकाम करण्यास सुरवात केली होती. त्यांच्या विणकामाचं सर्वच स्तरातून कौतूक होऊ लागलं. मात्र, कुष्ठरोगानं ग्रासलेल्या महिला जास्त वेळ काम करू शकत नव्हत्या. तेव्हा त्यांच्या मुलींनी विणकाम करण्यास सुरवात केल्यानं उत्पादनात वाढ झाली.. बेथाई कॉलनीतल्या महिला सुंदर अशा बॅग, बेडशीट आणि इतर वस्तूंचं विणकाम आणि शिवणकाम करतात. त्यांनी यातले कौशल्य मिळवले आहे.
सुरु असलेल्या ट्रेंडनुसार आम्ही सुती बॅग तयार करतो. बऱ्याच कंपन्या आमचे वस्तूची मागणी करतात. आम्ही त्यांना या बॅग देतो. आमच्या संस्थामध्ये जवळपास 50 जण काम करतात. आम्हाला काही भोजनालयातूनही ऑर्डस मिळतात, असे महिला कर्मचारी रोजा यांनी सांगितले.
ही हस्तनिर्मित उत्पादनं नामांकित कंपन्यांद्वारे खरेदी केली जातात. जी नंतर परदेशात विकली जातात. या हस्तकलेची निर्यात अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानमध्ये केली जाते. स्वावलंबनामुळे या महिलांच्या आत्मविश्वास वाढला आहे. परंतु त्यांना अद्याप सरकारकडून कोणतंही सहकार्य मिळालेले नाही. किमान त्यांना आरोग्य कार्डं द्यावीत, असा आग्रह ते सरकारकडं करत आहेत. या महिलांचे पती मजुरीचं काम करतात. त्यांची कमाई मोजकीच आहे. आता महिलाही कमवत असल्याने त्यांच्या कुटुंबाला हातभार लागतोय. या कामातून त्यांचा उदरानिर्वाह होतो. तसेच त्यांची मुले शिक्षण घेऊ शकतात. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे.
ही संस्था आता 600 हून अधिक कुष्ठरोगी आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देते. बेथानी कॉलनी कुष्ठरोग असोसिएशनने या कुष्ठरोगी रुग्णांच्या जीवनात आवश्यक बदल केला आहे. विणकाम युनिट गावातील 200 हून अधिक महिलांना अर्धवेळ काम देते. आतापर्यंत एकूण 1 कोटी किमतीच्या उत्पादनांची विक्री झाली असून संस्थेच्या कल्याणकारी योजनेचा 1000 हून अधिक लोक लाभ घेत आहेत. स्वाभिमानानं जीवन जगत आपल्याच नशिबाला आव्हान देणाऱया या लोकांची कथा अनेकांना प्रेरणा देणारी आहे.