नवी दिल्ली - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी भारताच्या 73 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा संदर्भाचा त्यांनी एक व्हिडिओ त्यांच्या टि्वटरवर शेअर केला आहे.
नमस्ते! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तमाम भारतवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! भारत आणि इस्त्रायलमधील संबंध आणखी मजबूत झाले आहेत. हीच खरी मैत्री आहे, असे बेंजामिन नेतन्याहू यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
-
יום העצמאות שמח הודו! 🇮🇱🇮🇳
— Benjamin Netanyahu (@netanyahu) August 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Happy Independence Day India!
सभी भारतवासियों को इजरायल की ओर से स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनायें।@NarendraModi pic.twitter.com/7afares7we
">יום העצמאות שמח הודו! 🇮🇱🇮🇳
— Benjamin Netanyahu (@netanyahu) August 15, 2019
Happy Independence Day India!
सभी भारतवासियों को इजरायल की ओर से स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनायें।@NarendraModi pic.twitter.com/7afares7weיום העצמאות שמח הודו! 🇮🇱🇮🇳
— Benjamin Netanyahu (@netanyahu) August 15, 2019
Happy Independence Day India!
सभी भारतवासियों को इजरायल की ओर से स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनायें।@NarendraModi pic.twitter.com/7afares7we
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री जगजाहीर आहे. मैत्री दिनाच्या दिवशी इस्त्रायलच्या दुतवास विभागाने पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ टि्वट केला होता. या व्हिडिओला शोले चित्रपटातील गाजलेले 'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे' या गाण्याची जोड दिली होती.
लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकाचा पराभव करून देशात मोदींनी सत्ता स्थापन केली. यावर सर्वांत अगोदर नेतन्याहू यांनी मोदींना शुभेच्छा दिल्या होत्या. 2017 मध्ये नरेंद्र मोदी इस्त्रायलच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी नेतन्याहून मोदींचे स्वागत करण्यासाठी स्व:ता विमानतळावर गेले होते.