ETV Bharat / bharat

कोलकात्यात भाजपा युवा मोर्चा आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळीनंतर पोलिसांचा लाठीहल्ला - kolkata bjp march live news

पश्चिम बंगालमधील राजधानी कोलकातामध्ये भाजप युवा मोर्चा आघाडीने आयोजित केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

भाजप आंदोलन
भाजप आंदोलन
author img

By

Published : Oct 8, 2020, 3:03 PM IST

Updated : Oct 8, 2020, 3:45 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालमधील राजधानी कोलकातामध्ये आज(गुरुवार) भाजपा युवा मोर्चाचे आयोजन केले आहे. सचिवालयावर नेण्यात येत असलेल्या या मोर्चाला 'मार्च टु नाबन्ना' असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, आंदोलनाने हिंसक वळण घेतले असून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीहल्ला केला. तसेच आंदोलकांना पांगविण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचाही वापर करण्यात येत आहे. राजभवन, सचिवालय परिसरात पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येविरोधात युवा मोर्चा आक्रमक झाला आहे.

कोलकात्यात भाजपा युवा मोर्चा आंदोलनाला हिंसक वळण

युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि जाळपोळ केल्यानंतर पोलिसांनी लाठीहल्ला केला. या मोर्चात भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या देखील सहभागी झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांची हत्या होत असल्याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला आहे. त्याबरोबरच आंदोलकांच्या इतरही मागण्या आहेत.

Bhavan
पोलिसांनी बॅरेकेट लावून परिसर सील केला आहे.

पश्चिम बंगाल भाजपचे उपाध्यक्ष राजू बॅनर्जी यांच्यासह अनेक कार्यकर्ते हिंसाचारात जखमी झाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी निषेध म्हणून टायर पेटवून दिले. अर्जून सिंग, कैलाश विजवर्गीय, लोकेत चॅटर्जी आणि मुकूल रॉय यांच्यासारखे नेते घटनास्थळी उपस्थित आहेत. जवळील हावडा जिल्ह्यातही आंदोलन पसरले आहे

  • West Bengal: BJP workers set ablaze tires in Howrah during party's state-wide 'Nabanna Chalo' agitation against the alleged killings of its workers. pic.twitter.com/CxWNZ7NayL

    — ANI (@ANI) October 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाजप युवा संघटनेने सात मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. राज्यातील ढासळती कायदा सुव्यवस्था हा या मागण्यांतील एक मुख्य मुद्दा आहे. शहरातील चार ठिकाणांवरून हा मोर्चा काढण्यात आला होता. हावडा मैदान येथे भाजप राष्ट्रीय युवा मोर्चाचे नवनियुक्त अध्यक्ष तेजस्वीनी सुर्या मोर्चात सहभागी झाले.

शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेला मोर्चा थांबविण्यासाठी पोलीस बळाचा वापर करत आहेत. ही ममता बंगाल यांच्या राज्याची परिस्थिती आहे, अशी टीका भाजपचे खासदार अर्जुन सिंह यांनी केला.

Last Updated : Oct 8, 2020, 3:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.