बेळगाव - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ जवळील श्रीनगर येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात औरंगाबाद (महाराष्ट्र) येथील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर, १ जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कारचे टायर फुटल्याने कार थेट समोरुन येणाऱ्या ट्रकवर जावून आदळली. भरधाव वेगात कार जात असल्याने अपघातात कारचा चक्काचूर झाला. अपघाताची नोंद उत्तर बेळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतांची ओळख पटवली असून मृतांमध्ये नंदु पवार (२९), अमोल नेवी (२८), सुरेश ठानेरी (३०), अमोल चौरी (२९) आणि महेश चौरी (२८) यांचा समावेश असून सर्वजण औरंगाबाद (महाराष्ट्र) येथील राहिवासी आहेत. हे सर्वजण गोव्याल फिरायला गेले होते. माघारी परतत असताना त्यांचा अपघात झाला.
उत्तर बेळगाव पोलिसांनी अपघाताची माहिती मृतांच्या घरच्यांना दिली असून पुढील तपास सुरू आहे.