लखनऊ : ज्या मुलासोबत लग्न ठरवले, त्याच्याऐवजी दुसराच नवरदेव लग्नाला उभा केल्यामुळे, चिडलेल्या वधूपक्षाने संपूर्ण वऱ्हाडींना ताब्यात घेऊन ठेवले. उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील धांतिगारा जिल्ह्यात ही अजब घटना घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, धांतिगारामध्ये राहणारे संजीव कुमार हे आपल्या मुलीसाठी मुलगा पहायला मणीपुरी गावामध्ये गेले होते. तेथे त्यांना एका मुलाचा फोटो दाखवण्यात आला, ज्याला त्यांनी आपल्या मुलीसाठी पसंत केले. मात्र, लग्नाच्या वेळी वऱ्हाडींसोबत दुसराच कोणीतरी तरुण नवरदेव म्हणून आला. आमची अशी फसवणूक झाल्यामुळे आम्ही सर्व वऱ्हाडींना ताब्यात घेऊन ठेवले, असे संजीव यांनी सांगितले.
वधूपक्षाने वरपक्षातील पाच लोकांविरोधात पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली. तसेच, लग्नासाठी आपण आतापर्यंत १२ लाख रुपये खर्च केला आहे, जो नुकसान भरपाई म्हणून वधू पक्षाने आपल्याला द्यावा अशी मागणीही कुमार यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर या वऱ्हाडींना सोडवण्यात आले. याप्रकरणी पोलीस केस दाखल झाली असून, अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा : मोबाईलमधून चिनी अॅप डिलीट करा, मोफत मास्क घ्या