ETV Bharat / bharat

आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे बजरंग दलाचा घरात घुसून हैदोस

मी माघारी यावे असे घरच्यांचे म्हणने आहे. परंतु, मला माघारी जायचे नाही. जर मला जबरदस्तीने त्यांनी घरी नेण्याचा प्रयत्न केला तर, आम्ही दोघेही होणाऱ्या मुलासोबत आत्महत्या करू, असे मुलीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.

आसाम बजरंग दलाचा हैदोस
author img

By

Published : Jun 20, 2019, 5:39 PM IST

होजाई - आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे जोडप्याच्या घरात घूसून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हैदोस घातल्याची घटना आसाममधील होजाई जिल्ह्यातील उत्तर दिमारपूर भागात घडली. या घटनेनंतर होजाई जिल्ह्यातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

घटनेनंतर जोडप्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात मुलगी म्हणत आहे की, ५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून आमच्या दोघांचे नाते आहे. तो दुसऱ्या धर्माचा आहे, हे मला माहिती होते. परंतु, काहीही झाले तरी मला त्याच्याशीच लग्न करायचे होते. माझ्या घरच्यांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी माझे दुसऱ्या मुलासोबत लग्न लावून द्यायचा प्रयत्न केला. त्यामुळे मी पळून जाऊन विवाह करण्याचा निर्णय घेतला. मी विवाह करुन सुखी आहे, मला हेही सांगायचे आहे की, मी ४ महिन्यांची गर्भवती आहे. मी माघारी यावे असे घरच्यांचे म्हणने आहे. परंतु, मला माघारी जायचे नाही. जर मला जबरदस्तीने त्यांनी घरी नेण्याचा प्रयत्न केला तर, आम्ही दोघेही होणाऱ्या मुलासोबत आत्महत्या करू.

याबाबत प्रत्यक्षदर्शींनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, जय श्री राम म्हणत जमावाने घरात प्रवेश केला आणि सामनाची तोडफोड केली. त्यांनी घरातील दिसेल त्या वस्तू फोडून टाकल्या. त्यांनी घर जाळण्याचाही प्रयत्न केला. कोणी चुकीचे केले असेल तर हा त्याचा उपाय नाही. तर, मुलाच्या घरच्यांनी याबाबत बोलताना म्हटले आहे की, तोडफोड करणाऱ्यांविरोधात होजाई पोलिसांनी कडक कारवाई करावी. पोलीस त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरले तर, जिल्ह्यात दंगे होण्याची शक्यता आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.