नवी दिल्ली - हरियाणामधील गुरुग्रामध्ये गो-तस्करी करणाऱ्यांनी बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये बजरंगदलाचा एक कार्यकर्ता जखमी झाला आहे. बुधवारी रात्री गुरुग्राममधील सेक्टर १० मध्ये ही घटना घडली आहे.
-
DCP (crime), Gurugram Rajiv Deshwal on cow vigilante shot: At last they fired bullets which hit a member of a cow vigilante org. He was immediately admitted to a hospital. 5 of the 6 smugglers identified. Vehicle of smugglers has been recovered, search for smugglers is underway. https://t.co/92jlzaPdky
— ANI (@ANI) October 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">DCP (crime), Gurugram Rajiv Deshwal on cow vigilante shot: At last they fired bullets which hit a member of a cow vigilante org. He was immediately admitted to a hospital. 5 of the 6 smugglers identified. Vehicle of smugglers has been recovered, search for smugglers is underway. https://t.co/92jlzaPdky
— ANI (@ANI) October 10, 2019DCP (crime), Gurugram Rajiv Deshwal on cow vigilante shot: At last they fired bullets which hit a member of a cow vigilante org. He was immediately admitted to a hospital. 5 of the 6 smugglers identified. Vehicle of smugglers has been recovered, search for smugglers is underway. https://t.co/92jlzaPdky
— ANI (@ANI) October 10, 2019
गो-तस्करी करणाऱ्यांचा बजरंग दलाचे कार्यकर्ते पाठलाग करत होते. यावेळी आपला पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांवर गोळी झाडली. यामध्ये बजरंग दलाचा कार्यकर्ता जखमी झाला होता. कार्यकर्त्याचे नाव मोनू मनेसर असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जवळपास 6 जण गाडीमध्ये गायी घेऊन जात होते. कार्यकर्त्यांनी त्यांना पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. कार्यकर्त्यांसह पोलिसांनीदेखील त्याच्या गाडीचा पाठलाग केला. यावेळी त्यांनी गायींना गाडीच्या बाहेर फेकायला सुरवात केली. ६ जणांपैकी ५ जणांची ओळख पटली आहे, अशी माहिती गुरुग्राम गुन्हा शाखेचे पोलीस उपायुक्त राजीव देशवाल यांनी दिली आहे.