लखनौ - बहुजन समाज पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. गौतम बुद्धनगर येथून सतबीर नागरमधून बसपकडून लढतील.
सहारणपूर येथून हाजी फजर्लुरहमान तर बिजनौरमधून मलूक नागर निवडणूक रिंगणात आहेत. नगीना येथून गिरीश चंद, अमरोहातून कुंवर दानिश अली, मेरठमधून हाजी मोहम्मद याकूब यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बुलंदशहर येथून योगेश वर्मा, तर अलीगडमधून अजीत बालियान निवडणूक लढवतील. आग्रामधून मनोज कुमार सोनी, फतेहपूर सिक्रीमधून राजवीर सिंह तर आंवला येथून रूचि वीरा यांना तिकीट देण्यात आले आहे.
BSP first list for Lok Sabha poll-UP pic.twitter.com/9reqP0aJn0
— Mayawati (@Mayawati) March 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">BSP first list for Lok Sabha poll-UP pic.twitter.com/9reqP0aJn0
— Mayawati (@Mayawati) March 22, 2019BSP first list for Lok Sabha poll-UP pic.twitter.com/9reqP0aJn0
— Mayawati (@Mayawati) March 22, 2019
उत्तर प्रदेशात लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युती झालेली आहे. सप-बसपदरम्यान जागावाटप झालेले आहे. समाजवादी पक्ष ३७ तर बसप ३८ जागांवर निवडणूक लढवत आहेत. अमेठी आणि रायबरेली येथे सप-बसप युतीचा उमेदवार नसणार आहे.