नवी दिल्ली - भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी 'आझाद समाज पक्ष' या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक आझाद समाज पक्ष ताकदीने लढवणार असल्याचे चंद्रशेखर यांनी जाहीर केले. या निवडणुकीत सर्व ठिकाणी युवकांना संधी देणार असल्याचे चंद्रशेखर म्हणाले.
यावेळी बोलताना चंद्रशेखर यांनी भाजप सरकारवर जोरदारा निशाणा लगावला. सरकार आरक्षण, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, नागरिकत्व आणि अर्थव्यवस्था या सर्व मुद्यांवर अपयशी ठरली आहे. सरकारने अशी परिस्थीती निर्माण केल्यामुळे नवीन पक्ष स्थापन करत असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले. सध्याचे सरकार लोकांवर हुकुमशाही अजेंडा राबवत असल्याचा आरोप चंद्रशेखर यांनी केला.