ETV Bharat / bharat

कोविड-१९ मॅनेजमेंटबाबत 'आयुष'चे आंतरराष्ट्रीय वेबिनार; जगातील पहिलाच प्रयोग - AYUSH webinar on corona care

आयुष मंत्रालयाच्या कोविड-१९ टास्क फोर्सने 'कोविड-१९ मॅनेजमेंटसाठी एकात्मिक काळजी' या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले आहे. अशा प्रकारचा जगातील हा पहिलाच वेबिनार असणार आहे. या टास्क फोर्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने, सह-अध्यक्ष डॉ. के. आर. कोहली, आणि सदस्य डॉ. जवाहर शाह (आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले होमिओपॅथी डॉक्टर) या तिघांकडे या वेबिनारची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

World's first International Educational Series on Integrative Care for COVID-19 Management by AYUSH
कोविड-१९ मॅनेजमेंटबाबत 'आयुष'चे आंतरराष्ट्रीय वेबिनार; जगातील पहिलाच प्रयोग
author img

By

Published : Oct 30, 2020, 7:02 AM IST

नवी दिल्ली : देशात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून आयुष मंत्रालय त्याला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामध्ये आयुष मंत्रालयातील महाराष्ट्र सरकारने तयार केलेल्या टास्क फोर्सचा मोलाचा वाटा राहिला आहे. याचाच एक भाग म्हणून, आता या टास्क फोर्सने 'कोविड-१९ मॅनेजमेंटसाठी एकात्मिक काळजी' या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन केले आहे. अशा प्रकारचा जगातील हा पहिलाच वेबिनार असणार आहे.

आयुषच्या कोविड-१९ साठीच्या टास्क फोर्सचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. टी. पी. लहाने, सह-अध्यक्ष डॉ. के. आर. कोहली, आणि सदस्य डॉ. जवाहर शाह (आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले होमिओपॅथी डॉक्टर) या तिघांकडे या वेबिनारची संपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे.

आयुषचे मंत्री श्रीपाद नाईक, आणि आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा हे या वेबिनारचे उद्घाटन करणार आहेत.

३ दिवस चालणार वेबिनार..

२९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत हे वेबिनार असणार आहेत. जगभरातील विविध प्रकारच्या उपचार पद्धतींचे आदान-प्रदान करणे हे या वेबिनारचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. केवळ कोरोना महामारीच नव्हे, तर पुढे येणाऱ्या इतरही वैद्यकीय समस्यांसाठी या वेबिनारचा फायदा होणार आहे.

भारतातील वैद्यकीय ज्ञान जगापुढे मांडणार..

भारताला पाच हजार वर्षांच्या वैद्यकीय ज्ञानाची देणगी लाभली आहे. हे ज्ञान जगासमोर मांडण्याचेही उद्दिष्ट या वेबिनारचे असणार आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी, योग आणि उनानी मेडिसीन या सर्वांच्या योग्य वापराने आपण रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढवून, कोरोनासारख्या रोगामधून बरे होण्याचा कालावधी आणखी कमी करु शकतो, हे आपण जगाला दाखवून देणार आहे.

जगभरातील वैद्यकीय अधिकारी असणार उपस्थित..

या वेबिनारला अमेरिका, इस्राईल आणि अशाच विविध देशांमधील डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी आणि प्रशिक्षक उपस्थित असणार आहेत. अ‌ॅलोपॅथी तज्ज्ञ, होमिओपॅथी तज्ज्ञ, आयुर्वेद तज्ज्ञ, उनानीचे हकीम, योगगुरू आणि अ‌ॅक्युपंक्चर तज्ज्ञ असे विविध तज्ज्ञ या वेबिनारला आपल्या ज्ञानाची देवाणघेवाण करतील.

हेही वाचा : 'ग्रीन मॅन ऑफ लुधियाना' आहेत तरी कोण, जाणून घ्या 'या' कर्तबगार अधिकाऱ्याविषयी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.