नवी दिल्ली - केंद्र सरकार स्थलांतरित कामगारांना बसेसची सुविधा पुरवू शकत नाही, असा आरोप काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील औरैया येथे झालेल्या भीषण अपघातात २४ मजुरांच्या मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियांका यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली.
-
सभी मृतकों के पार्थिव शरीरों को सम्मानपूर्वक उनके परिवारवालों तक पहुँचाया जाए। सभी घायलों का समुचित इलाज हो।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
और इन सबकी आर्थिक मदद की जाए। #Auraiya
">सभी मृतकों के पार्थिव शरीरों को सम्मानपूर्वक उनके परिवारवालों तक पहुँचाया जाए। सभी घायलों का समुचित इलाज हो।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 16, 2020
और इन सबकी आर्थिक मदद की जाए। #Auraiyaसभी मृतकों के पार्थिव शरीरों को सम्मानपूर्वक उनके परिवारवालों तक पहुँचाया जाए। सभी घायलों का समुचित इलाज हो।
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) May 16, 2020
और इन सबकी आर्थिक मदद की जाए। #Auraiya
आणखी एका दुर्दैवी घटनेमुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, सरकार कामगारांना घरी सुरक्षित पोहोचवण्यासाठी कुठली उपाययोजना करत आहे? कामगारांना घरी पोहोचवण्यासाठी बसेस का धावत नाहीत? केंद्र सरकारला हे दिसत नसावे, अशा शब्दांत प्रियांका यांनी टि्वट करत केंद्र सरकारवर टीका केली. केंद्र सरकार पूर्णपणे गोंधळलेले असल्याचाही आरोपही त्यांनी केला.
स्टेटमेंट जारी करणे एवढेच सरकारचे काम आहे का, असा सवाल करत सरकार सर्वकाही पाहत असूनही गोंधळलेले आहे, असे प्रियांका म्हणाल्या. उत्तर प्रदेशातील अपघातात मृतांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात यावेत, अशी मागणी करत अपघातातील जखमींना योग्य उपचार मिळायला हवेत, असेही त्या म्हणाल्या.
काय आहे घटना? -
उत्तर प्रदेशमध्ये ट्रकचा मोठा अपघात झाला आहे. यामध्ये 24 जण ठार झाले आहेत, तर 35 जण जखमी असून त्यातील 20 जणांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. 15 गंभीर जखमींना सैफिया रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास औरैया जिल्ह्यातील मिहौली भागात अपघात झाला. दिल्ली येथून येत असलेल्या डीसीएम व्हॅनची ट्रकला जोरदार धडक बसली. जवळपास 50 प्रवासी मजूर घेऊन येणारा हा ट्रक राजस्थानातून येत होता. ट्रकमधील बहुतांश स्थलांतरित हे मूळचे बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.