वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांच्या ७५व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. स्थानिक वेळेनुसार सोमवारी ही बैठक पार पडली. यावेळी पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यांना जागतिक संघटनेत सुधारणा घडवून आणण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांनी 'सुधारीत बहुपक्षीयतेची'ही मागणी केली.
संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधानांचा हा प्री-रेकॉर्डेड संदेश दाखवण्यात आला. आजच्या काळातील परिस्थितीनुसार आपल्याला सर्व राष्ट्रांच्या बहुपक्षीयतेमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे. तसेच, सर्व स्टेकहोल्डर्सना चालना देण्याची, आणि समकालीन आव्हाने सोडवत मानवी कल्याणावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
-
Marking 75 years of the @UN. https://t.co/2j7HPYjEGA
— Narendra Modi (@narendramodi) September 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Marking 75 years of the @UN. https://t.co/2j7HPYjEGA
— Narendra Modi (@narendramodi) September 21, 2020Marking 75 years of the @UN. https://t.co/2j7HPYjEGA
— Narendra Modi (@narendramodi) September 21, 2020
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर, ७५ वर्षांमध्ये पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांचे सर्व कार्यक्रम, सभा आणि बैठका व्हर्चुअली होत आहेत. सोमवारी सुरू होत असलेल्या महासभेमध्ये दहशतवादाशी लढण्याची प्रक्रिया, सुधारीत बहुपक्षीयता आणि समावेशक विकासाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि ती कायम ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्रे करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच, शांततेचा प्रसार करण्यासाठी भारतही कशाप्रकारे पुढाकार घेतो आहे, याची माहितीही मोदींनी दिली.