ETV Bharat / bharat

गुड न्यूज : ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू

author img

By

Published : Sep 12, 2020, 9:43 PM IST

जगभरात आतापर्यंत सुमारे १८ हजार स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. चाचणी दरम्यान एक व्यक्ती आजारी पडल्यामुळे चाचणी थांबविण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा नव्याने चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

file pic
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - कोरोना विरोधातील लढाईत संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची ब्रिटनमधील चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेकाने कोरोना लसीच्या चाचण्या पुन्हा सुरू केल्या आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना लसीचा डोस दिल्याने एक स्वयंसेवक आजारी पडला होता. लसीचे दुष्परिणाम होण्यामागे काय कारणे आहेत? याचा शोध घेण्यासाठी तज्ज्ञ पथक काम करत आहे.

आता ब्रिटनमध्ये लसीच्या क्लिनिकल चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. लस सुरक्षित असल्याचे ब्रिटनमधील 'मेडिकल हेल्थ रेग्युलेटरी अथॉरिटीने' परवानगी दिल्यानंतर चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. ब्रिटनमधील स्वयंसेवकावर लसीचे दुष्परिणाम दिसून आल्यानंतर सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीने भारतातील चाचण्याही थांबविल्या आहेत.

जगभरात आतापर्यंत सुमारे १८ हजार स्वयंसेवकांना या लसीचा डोस देण्यात आला आहे. चाचणी दरम्यान एक व्यक्ती आजारी पडल्यामुळे चाचणी थांबविण्यात आली होती. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अस्त्राझेनेका कंपनी आणि सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कंपनीकडून लस बनविण्यात येत आहे. सिरमला चाचण्यांसाठी लस निर्मिती करण्याची परवानगी काही दिवसांपूर्वी भारतातील औषध महानियंत्रकांनी दिली होती. कोरोनावरील लढाईतील ही महत्त्वाची लस असून संपूर्ण जगाचे या लसीकडे लक्ष्य लागले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.