ETV Bharat / bharat

कोरोनाचा असाही फटका, लॉकडाऊनमुळे ' रेडलाईट एरिया ' ओस - कोरोना

लॉकडाऊनचा फटका आसाममधील वेश्या व्यवसायावर झाला आहे.

corona effect
corona effect
author img

By

Published : Apr 4, 2020, 12:06 PM IST

सिलचर (आसाम) - कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लावलेल्या 21 दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा परिणाम सर्वच घटकांवर होत आहे. प्रामुख्याने या लॉकडाऊनमध्ये गरीब, मजूर, हातावर पोट असलेल्या कामगारांना जास्ती त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, या लॉकडाऊनचा फटका आसाममधील वेश्या व्यवसायावर झाला आहे.

देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सध्या सुरू आहे. या लॉकडाऊनचा फटका सर्वांनाच बसत आहे. शहरांमध्ये मोलमजूरी करणारे गरीब लोकं आता आपल्या मूळ गावाकडे जाताना दिसत आहे. जसा याचा फटका गरीबांना बसला आहे, तसाच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

दिवसभरातील कमाईवर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे पोट भरते. सध्या लॉकडाऊनमुळे नागरिक घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे वेश्या व्यावसायिक महिलांकडे ग्राहक येत नाहीत. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न उद्बवला आहे. दुसरीकडे अशा महिलांसाठी आसाममध्ये काही सामाजिक संस्था पुढे येत या महिलांचे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.