बार्पेता (आसाम) - आसाममध्ये पुराने थैमान माजवले आहे. बार्पेता जिल्ह्यातील ६५१ गावांमधील जवळपास ११ लाख नागरिक या पुरामुळे बाधित झाले आहे. तर मागील चोवीस तासामध्ये या आपत्तीमुळे एकाचा मृत्यू झाला आहे.
आसाममधील पूरस्थितीने एकूण १८ जिल्ह्याला घेरले आहे. सध्या बस्का, नालबरी, बार्पेता, चिरंग, बोनगाईगाव, कोक्राझर, ढुब्री, काम्रुप, मोरीगाव, मागाव, गोलघाट आणि जोरहाट जिल्ह्यामध्ये जवळपास ६५१ मदत केंद्रे कार्यरत आहेत. तर सोनीतपूर, बार्पेता कोक्राझर, काम्रुप आणि मोरीगाव याठिकाणी अतिरिक्त ४९ मदत केंद्रे लावण्यात आले आहे. आसाममधील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. ब्रम्हपुत्रा नदी देखील धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे.