ETV Bharat / bharat

आसाममध्ये पुराचा कहर.. २५ हजार नागरिकांना फटका, रंजन गोगाईंच्या घरात शिरले पाणी - २५ हजार नागरिकांना पुराचा फटका

आसाम राज्यातील १६ जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. संततधार पाऊस आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे जिल्ह्यातील २५ हजार लोकांचे जनजीवन विस्कळीत झालेय, असे दिब्रुगडचे उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Dibrugarh flood update
दिब्रूगड जिल्ह्याला पुराचा फटका
author img

By

Published : Jun 27, 2020, 10:57 AM IST

दिब्रुगड(आसाम)-आसाममध्ये संततधार पाऊस सुरू असल्याने पुराच्या पाण्याची पातळी वाढली आहे. संततधार पाऊस आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे दिब्रुगड जिल्ह्यातील २५ हजार लोकांना फटका बसला आहेे, असे दिब्रुगडचे उपायुक्त पल्लव गोपाल झा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

राज्यातील १६ जिल्ह्यांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांच्या संकटात वाढ झालीय. यामुळे राज्यातील परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

आसाममध्ये पुराचा कहर..

दिब्रुगड जिल्ह्यामध्ये १४ निवारा केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. पुराचे पाणी सेवानिवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या घरात घुसले आहे. प्रशासनाने त्यांच्या आजारी आईला सुरक्षित स्थळी हलवले आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीपासून दिब्रुगड शहराला पुराचा फटका बसू लागला. शहराच्या उत्तरेकडे जाणारे बहुतेक प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रुपाई टी इस्टेटजवळील डांगोरी नदीवरील आरसीसी पूल वाहून गेला.

राज्यातील ६ जिल्ह्यामध्ये प्रशासनाने १४२ निवारागृहे, मदतकेंद्र स्थापन केली आहेत. यामध्ये १८ हजार लोक राहत आहेत, अशी माहिती आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पोबिटोरा वन्यजीव अभयारण्यात पुराचे पाणी घुसले आहे. १०० गेंडे, हजारो डुक्कर, १५०० रानगवे या प्राण्यांना उंचवट्याच्या प्रदेशात हलवण्यात आले आहे. १२ हजार हेक्टर जमीन पुराच्या पाण्यामुळे प्रभावित झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.