ETV Bharat / bharat

आसाम संकटात! ब्रम्हपुत्रा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

author img

By

Published : Jun 25, 2020, 12:17 PM IST

केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी साजीदुल हक म्हणाले, की पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस जास्त झाल्याने नदीतील पाण्याचे प्रमाण वाढल आहे. बुधवारी धोक्याचा इशारा देण्यात आला, तेव्हा नदीतील पाण्याची पातळी 49.09 मीटर होती. हे प्रमाण धोक्याच्या पातळीपासून एक मीटर दूर होते.

ब्रम्हपुत्रा नदी
ब्रम्हपुत्रा नदी

गुवाहाटी (आसाम) – दरवर्षी आसाममध्ये भेडसावणारी पुराची समस्या यंदाही निर्माण झाली आहे. आसाममधील गुवाहाटीत ब्रम्हपुत्रा नदीच्या पातळीत वाढ सुरूच आहे. मुसळधार वृष्टीनंतर ब्रम्हपुत्रा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

केंद्रीय जल आयोगाचे अधिकारी साजीदुल हक म्हणाले, की पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस जास्त झाल्याने नदीतील पाण्याचे प्रमाण वाढल आहे. काल धोक्याचा इशारा देण्यात आला, तेव्हा नदीतील पाण्याची पातळी 49.09 मीटर होती. हे प्रमाण धोक्याच्या पातळीपासून एक मीटर दूर होते.

भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार (आयएमडी) बिहार आणि हिमालय पर्वत रांगा, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयमध्ये 25 ते 27 जूनदरम्यान मुसळधार पाऊस बरसणार आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरातून भारताच्या ईशान्य भागात व त्याच्या शेजारील पूर्व भागात जोराचे वारे वाहणार आहेत.

दरम्यान, आसाममधील पुराच्या स्थितीचा सुमारे 25 हजार लोकांना फटका बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.