ETV Bharat / bharat

'दिल्ली हिंसाचाराची जबाबदारी पंतप्रधान मोदींनी घ्यावी' - Asaduddin Owaisi news

दिल्ली दंगलीची जबाबदारी केंद्रामध्ये असलेल्या सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दंगलग्रस्त भागांचा दौरा करावा. मोदींनी शनिवारी आपल्या भाषणामध्ये दिल्ली हिंसाचा उल्लेखही केला नाही. एकीकडे मोदी 'सबका साथ सबका विकास' असे म्हणतात. मात्र, ती घोषणा प्रत्यक्षात आणत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

'दिल्ली हिंसाचाराची जबाबदारी मोदींनी घ्यावी'

author img

By

Published : Mar 2, 2020, 8:18 AM IST

हैदराबाद - दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी मोदी सरकारने घ्यावी आणि दंगलग्रस्त भागांचा दौरा करावा, असे आवाहन एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे. एमआयएमच्या 66 व्या स्थापनादिनानिमित आयोजित महामेळाव्यात ते बोलत होते.

भाजप नेत्याच्या भडकाऊ वक्तव्यामुळेच दिल्लीमध्ये हिंसा झाली. पूर्वनियोजित कट करून हिंसाचार घडवला असून धर्म आधारित द्वेषाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2002 च्या गुजरात दंगलीपासून काही धडा घेतला असेल, याची आशा आहे. ते काळजी घेतील, की पुन्हा तशी दंगल घडणार नाही, असेही ओवैसी यावेळी बोलताना म्हणाले.

ओवैसी पुढे म्हणाले, दिल्ली दंगलीची जबाबदारी केंद्रामध्ये असलेल्या सरकारची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दंगलग्रस्त भागांचा दौरा करावा. मोदींनी शनिवारी आपल्या भाषणामध्ये दिल्ली हिंसाचा उल्लेखही केला नाही. एकीकडे मोदी 'सबका साथ सबका विकास' असे म्हणतात. मात्र, ती घोषणा प्रत्यक्षात आणत नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ( एआयएमआयएम) हा देशामधील एक राजकीय पक्ष आहे. १९२६ साली स्थापन झालेल्या या पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे असून त्याची विचारधारा मुस्लीम धर्मावर आधारित आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व असून येथील विद्यमान खासदार असदुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.