ETV Bharat / bharat

शरद पवारांच्या कानशिलात मारणारा माथेफिरु 8 वर्षांनंतर अटकेत

author img

By

Published : Nov 13, 2019, 2:46 PM IST

Updated : Nov 13, 2019, 3:00 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कानशिलात मारणाऱ्या माथेफिरु आरोपीला दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली आहे. २०११ साली अरविंदसिंग उर्फ हरविंदरसिंग या व्यक्तीने शरद पवारांच्या कानशिलात मारली होती.

शरद पवार आणि हरविंदर सिंग

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कानशिलात मारणाऱ्या माथेफिरु आरोपीला दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली आहे. २०११ साली अरविंद सिंग उर्फ हरविंदर सिंग या व्यक्तीने शरद पवारांच्या कानशिलामध्ये मारली होती. त्यानंतर तो फरार झाला होता. दिल्ली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर आरोपीला अटक केली.

  • Delhi: Arvinder Singh (also known as Harvinder Singh), who had slapped NCP Chief Sharad Pawar in 2011, and was absconding since then, has been arrested by the police. He was declared a Proclaimed Offender by a Delhi Court in 2014. pic.twitter.com/4tEs7tphPq

    — ANI (@ANI) November 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

२०१४ साली दिल्ली न्यायालयाने हरविंदरसिंगला फरारी घोषित ठरवले होते. २०११ साली शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री असताना हरविंदसिंगने दिल्लीत शरद पवारांवर हल्ला केला होता. त्यानंतर तो फरार होता. दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ वर्षांनी आरोपीला अटक केली. घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र, कारवाई सुरू असतानाच तो फरार झाला होता. न्यायालयात हजर न राहिल्याने आरोपी हरविंदसिंगला फरार घोषित करण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. मात्र, ११ नोव्हेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपी हरिविंदर सिंग दिल्लीतील स्वतंत्र नगर येथील जे ब्लॉक येथील रहिवासी आहे. शरद पवारांवर हल्ला करण्याव्यतिरिक्त एका पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलल्या प्रकरणी हरविंदरसिंग याच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Intro:Body:

शरद पवारांच्या कानशिलात मारणारा आरोपी अखेर अटकेत

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या कानशिलात मारणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ वर्षांनंतर अटक केली आहे. २०११ साली अरविंद सिंग उर्फ हरविंदर सिंग या व्यक्तीने शरद पवारांच्या कानशिलामध्ये  मारली होती. तेव्हापासून तो फरार होता. दिल्ली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर  आरोपीला अटक केली.   

२०१४ साली दिल्ली न्यायालयाने हरविंदर सिंगला फरारी घोषित ठरवले होते. २०११ साली शरद पवार केंद्रिय कृषीमंत्री असताना हरविंद सिंगने दिल्लीत शरद पवारांवर हल्ला केला होता. तेव्हापासून तो फरार होता. दिल्ली पोलिसांनी तब्बल ८ वर्षांनी आरोपीला अटक केली.

घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आले होती. मात्र, कारवाई सुरू असतानाच तो फरार झाला होता. न्यायालयात हजर न राहिल्याने आरोपी हरविंद सिंगला फरार घोषित करण्यात आले होते. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. मात्र, ११ नोव्हेंबरला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपी हरिविंदर सिंग दिल्लीतील स्वतंत्र नगर येथील जे ब्लॉक येथे राहणार आहे. शरद पवारांवर हल्ला करण्याव्यतिरिक्त एका पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलल्या प्रकरणी हरविंदर सिंग यांच्यावर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Conclusion:
Last Updated : Nov 13, 2019, 3:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.