दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी ११ वाजता तपासणीसाठी त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गृहमंत्री अमित शाहा आणि केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.
गेल्या अनेक दिवसांपासून जेटली यांची प्रकृती खालावली होती. सद्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारा वेळीही अरुण जेटली यांनी प्रकृतीचे कारण देत मंत्रिमंडळात समाविष्ट न करण्यासंबंधी पत्र लिहिले होते.