ETV Bharat / bharat

सुजय विखें विरोधात राष्ट्रवादीकडून आमदार अरुण जगताप; आज घोषणा होण्याची शक्यता

जगताप कुटुंब मूळ श्रीगोंदा तालुक्यातील आहे. जिल्ह्यातील वजनदार नेते आणि भाजप आमदार शिवाजी कर्डीले हे जगतापांचे व्याही आहेत, आमदार संग्राम जगताप यांचे कर्डीले सासरे आहेत. आमदार अरुण जगताप यांचा शहरात मोठा दबदबा आहे.

अरुण जगताप
author img

By

Published : Mar 13, 2019, 9:44 AM IST

अहमदनगर - विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे यांच्या उमेदवारीमुळे नगर दक्षिणची जागा चर्चेत आली आहे. डॉ. सुजय यांनी नुकतेच मंगळवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सुजय यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अरुण जगताप यांना मैदानात उतरवत आहे. काल रात्री याबाबत अंतिम निर्णय झाला असून, मुंबईत आज (बुधवारी) याची घोषणा होणार आहे. आमदार जगताप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आमदार जगताप हे विधान परिषदेत दुसऱ्यांदा आमदार आहेत. तसेच त्यांचे पुत्र संग्राम जगताप हे ही २०१४ मध्ये मोदी लाट असताना राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत. जगताप कुटुंब मूळ श्रीगोंदा तालुक्यातील आहे. जिल्ह्यातील वजनदार नेते आणि भाजप आमदार शिवाजी कर्डीले हे जगतापांचे व्याही आहेत, आमदार संग्राम जगताप यांचे कर्डीले सासरे आहेत. आमदार अरुण जगताप यांचा शहरात मोठा दबदबा आहे. त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेस पक्षाकडून झाली. त्यानंतर मधल्या काही काळ ते शिवसेनेत होते. मात्र, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

आमदार अरुण जगताप यांची उमेदवारी ही पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मोठा विचार करून केली आहे. जगताप यांचे सोयरे-धायरे सर्व राजकीय पक्षात आहेत, त्याचा मोठा फायदा जगतापांना होऊ शकतो. विशेष करून आमदार कर्डीले यांची मोठी राजकीय अडचण होणार आहे, कर्डीलेच्या भूमिकेकडे त्यामुळे लक्ष असणार आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ते असल्याने तसेच श्रीगोंद्यात राष्ट्रवादी पक्षाचाच आमदार असल्याने तेथून मोठे मताधिक्य त्यांना अपेक्षित असेल. विखे यांचे पक्षांतर्गत कडवे विरोधक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची संपूर्ण ताकत जगताप यांच्या मागे उभी राहील. त्याचा फायदा पाथर्डी-शेवगाव आणि श्रीगोंदा मतदार संघात जगतापांना होणार आहे. या मतदारसंघात शरद पवार वैयक्तिक लक्ष घालणार असल्याने जगतापांच्या उमेदवारीने सुजय विखे यांना जिंकण्यासाठी अटीतटीची लढत द्यावी लागणार आहे.

Intro:अहमदनगर- जिल्ह्यामध्ये नगर (दक्षिण) आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदार संघात एकूण 33 लाख 93 हजार मतदार..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- जिल्ह्यामध्ये नगर (दक्षिण) आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदार संघात एकूण 33 लाख 93 हजार मतदार..

अहमदनगर- रविवारी संध्याकाळी निवडणूक आयोगाने देशातील लोकसभा निवडणुकांची घोषणा केल्यानंतर अहमदनगर येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदार संघा संदर्भातील माहिती पत्रकार परिषदेमध्ये विषद केली. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक घोषित केली असल्याने आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याचं सांगत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सर्व राजकीय पक्षांनी आदर्श निवडणूक आचारसंहितेचे पालन तंतोतंत करावं असं आवाहन करत आचारसंहितेचे पालन न करणाऱ्या आणि गैरप्रकार करणाऱ्यावर कोणाचीही गय केली जाणार नाही असं स्पष्ट केलं. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण 33 लाख 93 हजार 87 इतके मतदार आहेत. त्यापैकी नगर दक्षिण मतदारसंघात 18 लाख 31 हजार 537 इतके मतदार असून शिर्डी या अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघामध्ये 15 लाख 61 हजार 550 इतके मतदार आहेत. जिल्हाधिकारीनी सांगितले की आदर्श आचारसंहितेचे पालन होत नसल्यास नागरिकांनी सी-व्हिजल या ॲपवर छायाचित्र टाकावे, त्याचबरोबर समाधान या अँप्लिकेशन वर मजकूर टाकून आपली तक्रार नोंदवावी. जिल्हा नियंत्रण कक्षात याबाबत तातडीने दखल घेण्यात येऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल आणि गुन्हे नोंदविले जातील असं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या व्यक्तींवर हद्दपारीची प्रकरणे प्रलंबित आहेत त्याचबरोबर ज्यांचे शस्त्र परवाने रद्द करणे गरजेचे आहेत याबाबत संबंधित विभागाला तातडीने दखल घेत कारवाईचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गेल्या दोन दिवसांपूर्वीच शहरातील तीन आमदारांसह एक माजी आमदार अशा महत्त्वाच्या सहा राजकीय पक्षांच्या नेत्यांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकाऱ्याने रद्द केलेले आहेत

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जिल्ह्यामध्ये नगर (दक्षिण) आणि शिर्डी या दोन लोकसभा मतदार संघात एकूण 33 लाख 93 हजार मतदार..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.