श्रीनगर - पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लघंन करत जम्मू काश्मीरच्या पुंछ क्षेत्रामध्ये जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात १ भारतीय जवान हुतात्मा झाला असून ४ जवान जखमी झाले आहेत. रवी रंजन कुमार सिंह असे हुतात्मा झालेल्या जवानाचे नाव आहे. पाकिस्तानी सैन्याने सीमेवरील लष्करी चौक्या आणि गावांना लक्ष्य केले.
-
Jammu and Kashmir: Indian Army's Naik Ravi Ranjan Kumar Singh lost his life in ceasefire violation by Pakistan Army, in KRISHNA GHATI sector today. pic.twitter.com/LjkmrsyWoz
— ANI (@ANI) August 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Jammu and Kashmir: Indian Army's Naik Ravi Ranjan Kumar Singh lost his life in ceasefire violation by Pakistan Army, in KRISHNA GHATI sector today. pic.twitter.com/LjkmrsyWoz
— ANI (@ANI) August 20, 2019Jammu and Kashmir: Indian Army's Naik Ravi Ranjan Kumar Singh lost his life in ceasefire violation by Pakistan Army, in KRISHNA GHATI sector today. pic.twitter.com/LjkmrsyWoz
— ANI (@ANI) August 20, 2019
पुंछ जिल्ह्याच्या कृष्णा घाटी क्षेत्रामध्ये पाकिस्तानी सैन्याने आज (मंगळवारी) सकाळी ११ च्या दरम्यान गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या या आगळीकीला जोरदार प्रत्युत्तर दिले.
भारताने ३७० कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लघंन करण्यात येत आहे. मागच्या आठवड्यात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यामध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ३ जवानांचा खात्मा केला. यावेळी पाकिस्ताने भारताचे ५ जवान मारल्याचा दावा केला होता. मात्र, भारतीय लष्कराने हा दावा खोडून काढला.