ETV Bharat / bharat

लष्करप्रमुखांचा आज लेह भागात दौरा; भारत-चीन सीमा सुरक्षेवर होणार चर्चा - Ladakh

लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आज (मंगळवारी) दुपारी लेह भागात जाऊन सद्यपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. भारताच्या लष्करी कमांडर्सची कॉन्फरन्स सुरू आहे.

Army chief
लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे
author img

By

Published : Jun 23, 2020, 12:15 PM IST

नवी दिल्ली - लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे आज (मंगळवारी) दुपारी लेह भागात जाऊन सद्यपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. भारताच्या लष्करी कमांडर्सची कॉन्फरन्स सुरू आहे. ती संपल्यानंतर लष्करप्रमुख भारत-चीन सीमेवरील घडामोडी जाणून घेतील तसेच चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेचाही आढावा ते घेणार आहेत.

लष्करप्रमुखांची सोमवारी भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. लष्कराच्या अधिकृत माहितीनुसार, बैठकीमध्ये सर्व प्रकारचे कमांडर्सने सहभाग घेतल्याचे सांगितले.

याआधी नेमके काय घडले?

चीनच्या सैन्याने सोमवारी लाइन ऑफ अ‌ॅक्च्युअल कंट्रोलनजीक (एलएसी) तात्पुरते काही निशाण उभे केले. त्यानंतर आपल्या सैनिकांनी ते सर्व निशाण खाली उतरवले. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले. मात्र, त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसक झटापट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट झाल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले. यामध्ये भारताच्या २० जवानांना वीरमरण आले, तर चीनचे देखील ४०पेक्षा जास्त जवान मारले गेल्याचे सांगितले जात आहे. या झटापटीनंतर दोन्ही देशांतील तणाव प्रचंड वाढला. तसेच या मुद्द्यावरून विरोधकांनी देखील केंद्र सरकारला धारेवर धरले. चीनने भारताच नेमका किती भूभाग बळकावला आहे? याची माहिती देखील केंद्र सरकारकडे मागण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.