ETV Bharat / bharat

जाणून घ्या सशस्त्र सेना ध्वजदिनाविषयी... - राजनाथ सिंह सशस्त्र सेना ध्वजदिन

सशस्त्र सेना ध्वजदिन हा भारतात दरवर्षी ७ डिसेंबर यादिवशी साजरा केला जातो.

सशस्त्र सेना ध्वजदिन
सशस्त्र सेना ध्वजदिन
author img

By

Published : Dec 7, 2019, 11:14 AM IST

नवी दिल्ली - सशस्त्र सेना ध्वजदिन हा भारतात दरवर्षी ७ डिसेंबर यादिवशी साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट करून सशस्त्र सेना ध्वजदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मी भारतीय सैन्य आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या धैर्याला सलाम करतो, असे मोदींनी म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी जनतेला सैन्यासाठी या दिवशी आपले योगदान देण्याचे आवाहन केले आहे.

  • On Armed Forces Flag Day we salute the indomitable courage of our forces and their families.

    I also urge you to contribute towards the welfare of our forces. pic.twitter.com/WXQqWAFlPg

    — Narendra Modi (@narendramodi) 7 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोशल माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 'दरवर्षीप्रमाणे यंदाही सशस्त्र सेना ध्वजदिन साजरा केला जात आहे. हा दिवस आपल्या देशाबद्दलच्या आपल्या बलिदानाची आणि समर्पणाची आठवण करून देतो', असे राजनाथ यांनी म्हटले आहे.

यादिवशी देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या, पत्नींच्या व मुलांच्या, माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो.

जिल्हा सैनिक बोर्ड शाळा, कॉलेज व विविध संस्थांच्या मदतीने निधीची रक्कम गोळा करते. निधी देणारांना लाल, निळा व गडद निळ्या रंगांमध्ये असलेले कागदाचे टोकन फ्लॅग दिले जातात. फ्लॅगचे हे तीन रंग म्हणजे जिल्हा सैनिक बोर्ड, राज्य सैनिक बोर्ड व केंद्रिय सैनिक बोर्ड यांचे प्रतीक आहेत.

निधीचे संकलन एका विशिष्ट दिवशी करण्यात यावे व त्याचा विनियोग माजी सैनिक व सेवेतील सैनिकांसाठी व्हावा असा निर्णय जुलै १९४८ मध्ये घेतला. २८ ऑगस्ट, १९४९ ला संरक्षण मंत्रालयाच्या समितीने ७ डिसेंबर या दिवशी ध्वजदिन साजरा केला जाईल असे ठरविले.

Intro:Body:

fdgd

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.