नवी दिल्ली - उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन.डी तिवारी यांचा मुलगा रोहित शेखर याच्या मृत्यूविषयी अनेक धागेदोर समोर येत आहेत. यातच रोहित शेखरची आई उज्जवला यांनी केलेल्या वक्तव्यामुळे घटनेला वेगळे वळण मिळाले आहे.
रोहितची पत्नी अपूर्वा हिचे विवाहापूर्वी अनैतिक संबंध होते आणि संपत्तीसाठी ती रोहितला वारंवार त्रास देत होती. यातून दोघांमध्ये खटके उडत होते. दोघांतील सततच्या भांडणामुळे त्यांचे संबंध घटस्फोटापर्यंत ताणले होते.
अपूर्वाचे कुंटुंबीय पैशाचे भूकेले
उज्जवला यांनी सांगितले की, अपूर्वा आणि तिचे कुटुंबीय पैशासाठी भूकेले आहे आणि ते त्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. त्यांचे म्हणणे आहे कि, रोहित शेखर एनडी तिवारींचे एचडी असलेल्या राजीव यांच्या मुलाला संपत्तीतील हिस्सा देऊ इच्छित होता.
अपूर्वाने यासर्व गोष्टींना नकार दिला आहे. अपूर्वाचे म्हणने होते की, टिळक लेनमध्ये असलेल्या घरामध्ये तिच्या आईला जागा देण्यात यावी. ज्यामुळे ती संपत्तीमध्ये हिस्सेदार होऊ शकेल.
डिफेन्स कॉलनीमध्ये असलेल्या रोहित शेखरच्या घरामध्ये सध्या गुन्हे शाखेचे पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेबाबत तपास सुरु असून नातेवाईकांची चौकशी सुरु आहे.