ETV Bharat / bharat

AH-६४E Apache : हवाई दलाच्या ताफ्यात 'फ्लाइंग टँक' - एम आय-३५

१६ हेलफायर मिसाईल वाहण्याची क्षमता, ढगाळ वातावरणात लाँग बो रडारचा वापर, हायड्रा रॉकेट फायर सिस्टीम, तसेच ६००-६५० राऊंड्स एका मिनीटात डागण्याची क्षमता यामुळे अपाचे हेलिकॉप्टर्स शत्रूचा कर्दनकाळ ठरणार आहेत.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आठ अपाचे हेलिकॉप्टर्स दाखल
author img

By

Published : Sep 4, 2019, 3:09 PM IST

Updated : Sep 4, 2019, 3:30 PM IST

चंदीगढ - नुकतेच भारताच्या हवाई दलात 'अपाचे गार्डीयन' हे बहुप्रतिक्षीत असलेले चॉपर श्रेणीतील 'कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स' दाखल झाले आहेत. भारत व पाकिस्तानमधील सातत्याने वाढणाऱ्या तणावपूर्ण परिस्थितीत या आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या हेलिकॉप्टरचे महत्त्व वाढते. हवाई दलाने २०१५ साली यासंबंधी अमेरिकेशी करार केला होता. त्यानुसार याप्रकारचे २२ हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्यात येत आहे. २०२० पर्यंत ही ऑर्डर पूर्ण होणार असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील ८ अपाचे हेलिकॉप्टर्स भारताकडे सुपूर्त करण्यात आले आहेत. अमेरिकेच्या 'एरो स्पेस मेजर बोईंग' कंपनीकडून ही पूर्तता करण्यात आली असून, चॉपरच्या श्रेणीतील हेलिकॉप्टर्समुळे हवाई दलाच्या आधुनिकीकरणात भर पडली आहे.

Boeing AH-64 Apache news
हवाई दलाकडून या हेलिकॉप्टरचे स्वागत करण्यात आले.

याआधी भारताकडून 'एम आय-३५' या रशियन मेड हेलिकॉप्टर्सचा वापर होत होता. परंतु, या हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व अधिक मारक क्षमता अपाचेला युध्दभूमीवर घातक बनवते.
भारताआधी अमेरिका, इस्राईल तसेच इजिप्शियन हवाई दल, नेदरलँड्स हवाई दल यांच्याकडे या हेलिकॉप्टर्स आहेत. सध्या यूकेच्या आर्मीकडूनही याचे विकसित मॉडेल वापरण्यात येत आहे.

हेही वाचा 'अपाचे'ने हवाई दलाच्या लढाऊ क्षमतेत वाढ - बी. एस. धानोआ

हे हेलिकॉप्टर्स 'बॅटल टेस्टेड' असल्याने त्यांची विश्वासार्हता वाढली आहे. तसेच अफगाणिस्तान आणि इराकमधील युध्दांमध्ये या हेलिकॉप्टर्सने महत्त्वाची भूमिका बाजावली आहे. युध्दभूमीवर याआधीही हे यशस्वीरित्या वापरण्यात आल्याने त्याच्या वापराविषयीचे अनुभव लष्कराला समृध्द करतात.

भारताने आपल्या भौगोलिक गरजेनुसार यामध्ये काही तांत्रिक बदल करून घेतल्याने स्थानिक वातावरणात याचा वापर प्रभावी ठरणार आहे. भारताकडून हवाई दलासोबतच लष्करासाठीही ज्यादा ६ चॉपर्सची खरेदी होणार आहे. लष्कराच्या गरजेनुसार त्यामध्ये सुधारणा करण्यात येतील.

वाढवलेली इंधन कार्यक्षमता, एकाच वेळी विविध क्षेपणास्त्रे वाहण्याची क्षमता तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम इंजिन व रडार प्रणाली यामुळे अपाचेची युध्दभूमीवरील मारक क्षमता इतर हेलिकॉप्टर्सच्या तुलनेत वाढते. अत्याधुनिक डेटा नेटवर्किंग प्रणालीसोबतच आधुनिक कम्युनिकेशन यंत्रणा शत्रूबद्दल अचूक माहिती पुरवते. ही यंत्रणा सुविधा युध्दभूमिवरील माहिती व फोटोस् सहजपणे पाठवू शकते.

हेही वाचा ८ अपाचे अटॅक चॉपर हवाई दलात दाखल, एअर चीफ मार्शल धानोआ उपस्थित

भारताच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात वापरण्यासाठी यामध्ये योग्य बदल केल्याने काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशातही अपाचे हेलिकॉप्टर्स पूर्ण क्षमतेने काम करू शकतात.

'फायर अँड फरगेट' मिसाईल प्रणाली

एकदा मिसाईल सोडल्यानंतर कोणत्याही अडथळ्यांना ते स्वत: पार करून लक्ष्य भेदते. गायडेड मिसाईल प्रणालीमुळे शत्रूपासून सुरक्षित अंतर ठेवून अचूक मारा करून लक्ष्य भेदण्याची क्षमता या हेलिकॉप्टरची आहे. यामध्ये बसवण्यात आलेली 'लाँग बो रडार' प्रणाली ५० कि.मी. अंतरावरील २५६ लक्ष्यांना एकाच वेळी ओळखू शकते. तसेच उंचीवरही स्थिर उडण्यास सक्षम असल्याने शत्रूच्या रडार यंत्रणेला चकमा देण्यात यशस्वी होते.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Sep 4, 2019, 3:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.