पठाणकोट - भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आज अमेरिकन बनावटीची ८ अपाचे एएच-६४ ई अटॅक चॉपर्स दाखल झाली. यावेळी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस. धानोआ उपस्थित होते. यामुळे हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ झाली आहे. या हेलिकॉप्टरला आज 'वॉटर कॅनन सॅल्यूट' देण्यात आला.
-
Punjab: President Boeing India, Salil Gupte, handed over the ceremonial key of Apache attack helicopter to Air Chief Marshal BS Dhanoa. #PathankotAirbase pic.twitter.com/zxtOu1WSvg
— ANI (@ANI) September 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Punjab: President Boeing India, Salil Gupte, handed over the ceremonial key of Apache attack helicopter to Air Chief Marshal BS Dhanoa. #PathankotAirbase pic.twitter.com/zxtOu1WSvg
— ANI (@ANI) September 3, 2019Punjab: President Boeing India, Salil Gupte, handed over the ceremonial key of Apache attack helicopter to Air Chief Marshal BS Dhanoa. #PathankotAirbase pic.twitter.com/zxtOu1WSvg
— ANI (@ANI) September 3, 2019
भारताने युद्धभूमीवर अत्यंत उपयुक्त असणाऱ्या २२ अत्याधुनिक अपाचे हेलिकॉप्टर्सच्या खरेदीसाठी अमेरिकेशी सप्टेंबर २०१५ मध्ये करार केला होता. कोट्यवधी डॉलर्सच्या या व्यवहारानुसार, ८ अपाचे हेलिकॉप्टर्स पठाणकोट येथे आज भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाली. पाण्याच्या तोफांची सलामी देऊन या हेलिकॉप्टर्सचे स्वागत करण्यात आले.
अमेरिकेच्या बोईंग कंपनीने ८ अपाचे चॉपर्सची पहिली तुकडी भारताकडे सोपवली. सर्व हेलिकॉप्टर्स २०२० पर्यंत भारतात येणार आहेत. जगातील आक्रमक हेलिकॉप्टर म्हणून अपाचे अटॅक हेलिकॉप्टर ओळखले जाते. उंच डोंगररांगामध्ये या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. सध्या भारताकडे रशियन बनावटीची एमआय- ३५ ही चॉपर्स आहेत. मात्र, त्यांचा सेवा देण्यायोग्य कालावधी संपत आला आहे. लवकरच ही हेलिकॉप्टर्स निवृत्त करण्यात येतील. त्यांची जागा अत्याधुनिक बनावटीची अपाचे हेलिकॉप्टर्स घेतील.
-
#WATCH Punjab: The Apache chopper receives water cannon salute, before induction at the Pathankot Air Base. pic.twitter.com/YNT49rjr3B
— ANI (@ANI) September 3, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Punjab: The Apache chopper receives water cannon salute, before induction at the Pathankot Air Base. pic.twitter.com/YNT49rjr3B
— ANI (@ANI) September 3, 2019#WATCH Punjab: The Apache chopper receives water cannon salute, before induction at the Pathankot Air Base. pic.twitter.com/YNT49rjr3B
— ANI (@ANI) September 3, 2019
कोणत्याही मिशनच्या आवश्यकतेनुसार क्षमता असलेले हे एकमेव लढाऊ हेलिकॉप्टर आहे, अशी माहिती बोईंग कंपनीने दिली आहे. अमेरिकेने आतापर्यंत विविध देशांना अशा २२०० हेलिकॉप्टर्सची विक्री केली आहे. ही हेलिकॉप्टर्स खरेदी करणारा भारत १६ वा देश आहे. याचे काही महत्त्वाचे भाग भारतात बनवण्यात आले आहेत.