ETV Bharat / bharat

जगन मोहन रेड्डी हे 'तुळशीच्या बागे'तले 'गांजाचे रोपटे' - चंद्राबाबू नायडू

नायडू यांनी यापूर्वी जगन यांना 'गुन्ह्यांचे ब्रँड अॅम्बॅसिडर' म्हणून ओळखले जाते, असा आरोप केला होता. 'वायएसआरसीपी अध्यक्ष हे एकमेव असे नेते आहेत, ज्यांच्या नावावर देशात ३१ गुन्ह्यांची नोंद आहे. ते राज्यातील एकमेव समस्या आहेत,' असे ते म्हणाले.

author img

By

Published : Mar 25, 2019, 6:37 AM IST

Updated : Mar 25, 2019, 7:36 AM IST

चंद्राबाबू नायडू, जगन मोहन रेड्डी

अमरावती - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वाय. एस. जगन मोहन रेड्डी हे 'तुळशीच्या बागे'तले 'गांजाचे रोपटे' असल्याची टीका केली. येत्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर नायडून यांनी रविवारी हे वक्तव्य केले.

जगन मोहन रेड्डींचा घरचा जिल्हा कडापा येथे टीडीपीचा प्रचार करताना नायडू यांनी त्यांना लक्ष्य केले. 'कडापा जिल्ह्याने अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांना जन्म दिला आहे. यात आण्णामय्या, वीर ब्राह्मेंद्र स्वामी, योगी वेमाना अशा 'तुळशीच्या बागे'सारख्या व्यक्तींचा यात समावेश आहे. मात्र, या तुळशीच्या बागेत एक 'गांजाचे रोपटे' उगवले आहे. ते म्हणजे जगन मोहन रेड्डी,' असे नायडू यांनी एका सभेत भाषण करताना म्हटले.

नायडू यांनी यापूर्वी जगन यांना 'गुन्ह्यांचे ब्रँड अॅम्बॅसिडर' म्हणून ओळखले जाते, असा आरोप केला होता. 'वायएसआरसीपी अध्यक्ष हे एकमेव असे नेते आहेत, ज्यांच्या नावावर देशात ३१ गुन्ह्यांची नोंद आहे. ते राज्यातील एकमेव समस्या आहेत,' असे ते म्हणाले. येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये वायएसआरसीपी पक्षाला कायमचे पुसून टाका, असे आवाहन नायडू यांनी लोकांना केले.

'जगन यांच्यापासून हिंसकतेचा धोका आहे. स्वतःच्या काकांनाच ठार मारणाऱ्या व्यक्तीपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे. असा माणूस काहीही करू शकतो,' असे सांगत नायडू यांनी वाय. एस. विवेकानंद रेड्डी यांच्या नुकत्याच झालेल्या खुनाची आठवण करून दिली. या खून प्रकरणाला एखाद्या गुप्तहेरीवर आधारित कादंबरीहूनही अधिक कंगोरे आहेत. नायडू यांनी जगन या खुनाला राजकीय मैलाचा दगड ठरवू पाहात आहे, असा आरोप त्यांनी केला.

Intro:Body:

Conclusion:
Last Updated : Mar 25, 2019, 7:36 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.