मुंबई : नीता अंबानीच्या लक्झरी ब्युटी ब्रँडनं बुधवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझा येथे आपल्या फ्लॅगशिप स्टोअरचे अनावरण केले. या कार्यक्रमात बी-टाऊनचे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. यावेळी कियारा अडवाणी, करीना कपूर खान, सुहाना खान आणि तृप्ती डिमरी यांनी देखील हजेरी लावली होती. या कार्यक्रमातून बी-टाऊनमधील अनेक सेलिब्रिटीचे फोटो समोर आले आहेत. दरम्यान यावेळी करिनानं ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता. या लूकमध्ये करीना खूपच सुंदर दिसत होती. तर, शाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खानच्या लूकबद्दल बोलयचं झालं तर तिनं नेव्ही ब्लू कॉर्ड सेट परिधान केला होता. याशिवाय कियारा अडवाणी लाल रंगाच्या मिनी आउटफिटमध्ये होती. या तिघांनीही यावेळी हसत कॅमेऱ्यासमोर पोझ दिली.
शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतचा व्हिडिओ व्हायरल : या कार्यक्रमात शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूतही उपस्थित होते. यावेळी दोघेही स्टायलिश अंदाजात स्पॉट झाले. या कार्यक्रमात शाहिदनं पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पॅन्ट परिधान केला होता, तर मीरानं हिरव्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस घातला होता. यावेळी दोघेही एकत्र खूप सुंदर दिसत होते. याशिवाय राजकुमार रावही पत्नी पत्रलेखाबरोबर कार्यक्रमाला हजर होता. या जोडप्यानं देखील पापाराझीसमोर फोटोसाठी पोझ दिली होती. याशिवाय अर्जुन कपूरही या कार्यक्रमात कूल लूकमध्ये पोहोचला होता.
करीना, कियारा आणि सुहानाच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया : रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा नीता अंबानी आणि ईशा अंबानी या स्टोअरच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात सोनाली बेंद्रे, महीप कपूर, सीमा खान आणि नीलम यांच्यासह अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम खूप भव्य करण्यात आला होता. आता या कार्यक्रमामधील करीना, कियारा आणि सुहानाच्या एका व्हिडिओवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरनं यावर लिहिलं, 'सुहाना कधीपासून सुंदरी दिसायला लागली.' आणखी एकानं लिहिलं, 'कियारा खूप सुंदर दिसत आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'कियारानं दीपिका पदुकोणची कॉपी केली आहे.' याशिवाय काहीजणांनी या व्हिडिओवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट केले आहेत.
हेही वाचा :