भुवनेश्वर : वैद्यकीय पूर्वपरीक्षा 'नीट'मध्ये नापास होण्याच्या भीतीने एका १८ वर्षांच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ओडिशाच्या मयुरभंज जिल्ह्यात ही घटना घडली. उपासना साहू असे या मुलीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री तिच्या पालकांना तिने आत्महत्या केल्याचे समजले. त्यानंतर तातडीने तिला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बद्रिपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक बी. सेनापती यांनी याबाबत माहिती दिली.
पोलिसांना तिच्या घरातून आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली. यामध्ये तिने नीट परीक्षेत नापास होण्याचा भीतीने आपण हे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. साहू ही राजस्थानच्या कोटामध्ये नीटची तयारी करत होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षण संस्था बंद करण्यात आल्यानंतर, मे महिन्यात ती आपल्या घरी परतली होती.
हेही वाचा : दिल्ली हिंसाचार प्रकरणी उमर खालीदला अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई