ETV Bharat / bharat

वाघांमध्ये आढळत आहेत कॅनायन डिस्टेंपर विषाणू !

वाघिणीच्या शरीरात कॅनायन डिस्टेंपर विषाणूची प्रतिपिंड असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे इतर वाघांच्या मृत्यचे कारण कॅनायन डिस्टेंपर विषाणू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तज्ञ्जांच्या माहितीनुसार, विषाणूसंक्रमित प्राण्यांचे भक्षण केल्यानंतर वाघांनाही विषाणूची बाधा होऊ शकते. हा विषाणू कुत्री आणि इतर पाळीव प्राण्यांपासून वाघांपर्यंत पोहोचतो आहे. हा विषाणू वाघांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करुन मेंदूलाही नुकसान करतो.

रामगंजमंडी
anti-body-of-canine-distemper-virus-found
author img

By

Published : Oct 18, 2020, 8:11 PM IST

रामगंजमंडी (कोटा) - अनेक वाघांच्या मृत्यूच्या घटना उघडकीस आल्यानंतर वन्य जीवप्रेमींनी देखील कॅनायन डिस्टेंपर विषाणूच्या शंकेमुळे चौकशीची मागणी केली होती. त्यातच मुकुंदरा हिल्स टायगर रिजर्वमधील वाघिण एमटी-4 ची प्रकृती खराब झाली होती. त्यावेळी वनअधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली होती. मेडिकल रिपोर्टमध्ये तिच्या शरीरात कॅनायन डिस्टेंपर विषाणूच्या अँन्टीबॉडीज म्हणजेच प्रतिपिंड असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे इतर वाघांच्या मृत्यूचे कारण कॅनायन डिस्टेंपर विषाणू असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सूत्रांच्या माहितीप्रमाणे, वाघिणीच्या शरीरात जरी प्रतिपिंडे असली तरीही अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार वाघिणीला आता कुठलाही धोका नाही. या माहितीवरुन वाघांना आणि इतर प्राण्यांना सुरक्षित केले जाऊ शकते, असे वन्यजीव प्रेमींनी म्हटले आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, विषाणूसंक्रमित प्राण्यांचे भक्षण केल्यानंतर वाघांनाही विषाणूची बाधा होऊ शकते. हा विषाणू कुत्री आणि इतर पाळीव प्राण्यांपासून वाघांपर्यंत पोहोचतो आहे. हा विषाणू वाघांच्या मज्जासंस्थेवर परिणाम करुन मेंदूलाही नुकसान करतो.

पर्यावरणप्रेमी डॉ. सुधीर गुप्ता यांनी सांगितले आहे की, वाघांचा या विषाणूपासून बचाव करण्यासाठी त्यांना लस दिली जाईल. कॅनायन डिस्टेंपर विषाणू प्रामुख्याने कुत्र्यांमध्ये आढळतो, संक्रमित कुत्र्यांची शिकार वाघांनी केल्यास वाघदेखील संक्रमित होतात.

कॅनायन डिस्टेंपर विषाणू
- हा विषाणू श्वसन, जठर, आतडे आणि मध्यवर्ती मज्जासंस्था तसेच डोळ्यांत गंभीर संक्रमण करु शकतो.

- लांडगे, कोल्हे, रेकून, लाल पांडा, फेरेट, हायना, वाघ आणि सिंह अशा मांसाहारी प्राण्यांना विषाणू संक्रमित करु शकतो.

- राजस्थानच्या रणथंभोर नॅशनल पार्कमध्ये 86% कुत्र्यांच्या शरीरात या विषाणूची प्रतिपिंडे आढळली आहेत.

- गेल्या वर्षी गिर अभयारण्यातील 20 वाघ विषाणूने संक्रमित झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.