भुवनेश्वर (ओडीशा) - सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पुरी येथील जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यासाठी येथील प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्या आहे. मात्र, दरवर्षी भक्तांचा जसा मोठा जनसागर या ठिकाणी असतो, तसा जन समुदाय यंदा नाही. भक्तांना पुरीला येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनी घरीच राहून दर्शन करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.
श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनेचे मुख्य प्रशासक कृष्णकुमार म्हणाले, या यात्रेची तयारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. यामुळे मंदिर प्रशानाच्या वतीने सर्व नियोजन करण्यात आले आहेत.
ही यात्रा १२ व्या शतकापासून निघते. त्यावेळीपासून या यात्रेत तीन रथांचा समावेश असतो. यामध्ये भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र व देवी सुभद्रा यांच्या रथांचा समावेश असतो. परंपरेनुसार अज्ञानमाला मिळाल्यानंतर रथ यात्रेला सुरुवात होते. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण समीतीचे प्रमुख एन.सी. पाल यांनी सोमवारी त्या लाकडी रथांची पाहणी केली. त्यानंतर आज ही रथयात्रेला सुरुवात झाली.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही यात्रा ठराविक मार्गावरूनच निघेल. तसेच या यात्रेत जास्त लोकांनी गर्दी करु नये, याप्रकारे नियोजन करावे व यात्रेदरम्यान कर्फ्यू लावण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे. हे कर्फ्यू सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून लागू करावा, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार प्रशासनाच्या वतीने सर्व नियोजन करण्यात आले असून त्यानुसार रथ योत्रा सुरू आहे.
हेही वाचा - देशभरातील कोरोनासंबंधी महत्वाच्या घडामोडी... वाचा एका क्लिकवर