विजयवाडा - आंध्र प्रदेशमधील एसआरएम विद्यापिठात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने मसाल्यांचा वापर करुन तब्बल ५४.६७ चौरस मिटर फूटची एक पेंटिंग तयार केली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मसाले वापरून ५४ चौरस मिटर फुटची पेंटिंग तयार केल्यामुळे तिच्या नावाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. श्रेया तातिनेनी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.
श्रेया तातिनेनी ही इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीची विद्यार्थिनी आहे. तिने एक तरुण मुलगी सुर्योदय बघत असल्याची पेंटिंग रंगवली. मात्र, या पेंटिंगसाठि तिने कुठलेही रंग न वापरता स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या विविध मसाल्यांचा वापर केला आहे. या पेंटिंगमधील सुर्यादयाचे चित्र चितारण्याकरता तिने हळद आणि कुंकूचा वापर केला. तसेच, या पेंटिंगला पूर्ण करण्यासाठी तिला सुमारे ४ तासांचा अवधी लागला. 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये तिला स्थान मिळावे म्हणून तिने गिनीज बुक पॅनेलच्या ज्युरीच्या उपस्थितीत या पेंटिंगला पूर्ण करत तिने या विक्रमावर आपलने नाव शिक्कामोर्तब केले.
यानंतर, १३ मे रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कमिटीने विद्यापीठाच्या मालकीला ई-मेल पाठवून तिच्या पेंटिगची गिनीज बुकमध्ये नोंद करण्यात आल्याचे सांगितले. तसेच, या विक्रमाची नोंद करण्यात तिच्या नावी करण्यात आल्याचेही कळवले.
माध्यमांशी आपल्या चित्रकलेविषयी बोलताना, श्रेयाने चित्रकला तिच्यासाठी नेहमीच स्ट्रेस बस्टर असल्याचे म्हणाली. 'जेव्हा मी मसाल्यांनी बनविलेले अवाढव्य चित्रांचे काही व्हिडिओ पाहिले तेव्हा आपणही असेच काहितरी करावे, असा विचार मनात आला. म्हणूनच, माझ्या पेंटिंगच्या कामांसाठी मी हळद, केशर आणि इतर मसाल्यांचा वापर करण्याचे ठरविले,' असे ती म्हणाली.
तर, काहीतरी वेगळे करण्याच्या विचारानेच आपल्याला अशा प्रकारे काम करण्यासाठीची प्रेरणा मिळाली असल्याचेही श्रेया सांगते. मात्र, 'गिनीज बूकमध्ये नाव नोंदवणे किंवा स्वत:च्या नावावर एखादा रेकॉर्ड रजिस्टर करणे हे काही सोपे काम नाही. याकरता बरीच मेहनत आणि परिश्रम करावे लागतात. मात्र, याच परिश्रमाने आपल्याला काम करण्याची स्फूर्ती आणि आत्मविश्वास मिळाल्याचे श्रेया म्हणाली. भविष्यात काय करणार, असे विचारले असता, 'येत्या काळात, मला अमेरिकेतून माझे एमबीए पूर्ण करायची इच्छा आहे,' असं मत श्रेयाने व्यक्त केले.