हैदराबाद - डॉ. निम्मगड्डा रमेश कुमार यांना गुरुवारी आंध्र प्रदेशचे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. राज्य पंचायत राज व ग्रामविकास प्रधान सचिव गोपाल कृष्ण द्विवेदी यांनी गुरुवारी याबाबत आदेश जारी केला. राज्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुमार यांना एसईसी म्हणून पुन्हा नियुक्त करण्यात आल्याचे राज्यपालांच्या अधिसूचनेत म्हटले आहे.
आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आंध्र प्रदेशचे राज्यपाल, विश्वभूषण हरीचंदन यांनी डॉ. एन. रमेश कुमार यांच्याकडे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार सोपवला आहे.
स्थानिक संस्था निवडणुका तहकूब केल्यानंतर डॉ. रमेश कुमार यांना वायएसआरसीपी सरकारने एसईसी पदावरून काढून टाकले. या सर्व घडामोडींमुळे राजकीय वादळ निर्माण झाले. हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई सुरूच आहे.