ETV Bharat / bharat

जगन आणि केसीआर हे मोदींचे पाळीव कुत्रे, चंद्राबाबू नायडूंचे वादग्रस्त वक्तव्य - नरेंद्र मोदी

भाजप आणि टीआरएस हे वायएसआरसीपीच्या राजकीय प्रचाराला पैसे पुरवित असल्याचा आरोप चंद्राबाबुंनी केला. कोट्यवधी रुपये खर्च केले तरी ते निवडणुकीत जिंकू शकणार नाहीत, असा त्यांनी दावा केला.

चंद्राबाबू नायडू
author img

By

Published : Apr 9, 2019, 7:11 AM IST

आंध्रप्रदेश - आंध्रप्रदेशमध्ये राज्यातील निवडणुकीचा प्रचार शिगेला आला असतानाच मुख्यमंत्री चंद्राबाबुंनी अत्यंत खालच्या पातळीवर जावून प्रतिस्पर्ध्यांवर टीका केली आहे. वायएसआरसीपीचे अध्यक्ष जगमोहन रेड्डी आणि टीआरएसचे अध्यक्ष के.चंद्रशेखर राव हे चंद्राबाबुंचे प्रतिस्पर्धी आहेत. ते दोघेही नरेंद्र मोदी यांचे पाळीव कुत्रे असल्याचे चंद्राबाबू म्हणाले. ते मच्छलीपट्टणम भागातील राजकीय रॅलीत संबोधत होते.

चंद्राबाबू नायडू यांनी जगमोहन रेड्डी व केसीआर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, जगमोहन रेड्डी हे कुत्र्याचे बिस्कीट खातात, हे लाजिरवाणे आहे. ते बिस्किट आपल्यामध्येही वितरित करत आहेत. जगमोहन रेड्डी आणि केसीआर हे मोदींचे पाळीव कुत्रे आहेत. ते एका बिस्किटासाठी मोदींच्या पायाशीही जाणार आहेत. सावध रहा, ते बिस्किट जगन आपल्यामध्येही वितरित करणार असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली.

भाजप आणि टीआरएस हे वायएसआरसीपीच्या राजकीय प्रचाराला पैसे पुरवित असल्याचा चंद्राबाबुंनी आरोप केला. कोट्यवधी रुपये खर्च केले तरी ते निवडणुकीत जिंकू शकणार नाहीत, असा त्यांनी दावा केला.

पुढे ते म्हणाले की, मोदी आणि केसीआर यांनी १ हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. केसीआर, तुम्ही तुमच्या राज्याचे पैसे आमच्याकडे का पाठविले? जरी तुम्ही १० हजार कोटी रुपये खर्च केले तरी तुम्हाला एक मतही मिळू शकणार नाही. आमचे लोक तुमच्यावर प्रचंड चिडलेले असल्याचे नायडू म्हणाले.

आंध्रप्रदेशमध्ये ११ एप्रिलला लोकसभा आणि विधानसभा या दोन्हींसाठी निवडणूक होणार आहे. तर २३ मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

Intro:Body:

कोईम्बुतरमध्ये १ कोटी जप्त

कोईम्बुतुर - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी १८ एप्रिलला मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी पैसा व दारुचा वापर होवू नये म्हणून निवडणूक आयोगाचे दक्षता पथक व पोलीस दक्ष आहेत. कोईम्बुतरमधील पोलिसांनी १ कोटी रुपये जप्त केले आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.