श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे २ दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवादी आणि जवानांमध्ये उडालेल्या चकमकीत सीआरपीएफच्या ५ जवानांना वीरमरण आले असून तर, १ दहशतवादी ठार झाला आहे. तर, एक स्थानिक महिलाही गोळीबारात जखमी झाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी 'अल उमर'ने घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथे केपी रोडवरुन केंद्रीय सुरक्षा बलाच्या जवानांचा ताफा जात असताना दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. याआधीही पाकिस्तानकडून करण्यात आलेला गोळीबारात भारताच्या एका जवानाला वीरमरण आले होते. तर, सीमारेषेवर राहणाऱ्या स्थानिकांचेही यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आता, भरदिवसा झालेल्या गोळीबारामुळे अनंतनाग परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.