ETV Bharat / bharat

'माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले होते'; 'त्या' वक्तव्यावरून केंद्रिय मंत्री हेगडे यांचे घूमजाव - backs

'गांधीजींची हत्या केल्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गांधीजी यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या विषयी माझ्या मनात आदर आहे. माझे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याने ते ट्विट झाले, ' असे ट्विट केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केले आहे.

केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे
author img

By

Published : May 17, 2019, 1:04 PM IST

नवी दिल्ली - महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला प्रज्ञासिंह ठाकूर यांनी देशभक्त म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचे केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनीदेखील प्रज्ञासिंह यांचे समर्थन केले होते. यावरून हेगडे यांनी घूमजाव केले असून माझे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचे त्यांनी सांगितले.

'गांधीजी यांची हत्या केल्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. गांधीजी यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या विषयी माझ्या मनात आदर आहे. माझे ट्विटर अकाउंट हॅक झाल्याने ते ट्विट झाले, ' असे ट्विट हेगडे यांनी केले आहे.

नथुराम गोडसेंसंदर्भातील विधानाबाबत प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपने माफी मागायला लावली होती. त्यानंतर पुन्हा अनंतकुमार हेगडे यांनी ट्विट करून प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. सात दशकांनंतर सध्याची पिढी गोडसे यांच्याबाबत चर्चा करत आहे. ही चर्चा पाहून नथुराम गोडसेलाही आनंद झाला असेल, असे ट्विट अनंतकुमार हेगडे यांनी केले होते.

भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला होता. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडून पक्ष याबाबतचे स्पष्टीकरण मागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या वक्तव्याबाबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी जाहीर माफी मागायला हवी, असेही पक्षाकडून प्रज्ञासिंह ठाकूर यांना सांगण्यात आले होते. आता अनंतकुमार हेगडे यांनी या वादात उडी घेऊन माफीही मागितली आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.