भोपाळ : उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी आज (बुधवार) मध्यप्रदेशच्या प्रभारी राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांची प्रकृती अस्थिर असल्यामुळे आनंदीबेन यांच्यावर ही अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
मध्यप्रदेश उच्च न्यायालायचे मुख्य न्यायाधीश अजय कुमार मित्तल यांनी पटेल यांना शपथ दिली. राज्याचे राज्यपाल टंडन यांना सध्या श्वसनाच्या त्रास, मूत्रपिंडाचा विकार आणि तापामुळे लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल राहण्यापूर्वी आनंदीबेन यांनी मध्यप्रदेशच्या राज्यपाल म्हणूनही काम केले आहे.