नवी दिल्ली - शहरातील भजनपूरा भागामध्ये निर्माणाधीन इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. जवळपास 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. बचाव कार्य सुरू असून एनडीआरएफचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.
संबधित इमारतीमध्ये शिकवणी वर्ग सुरू असल्याची माहिती आहे. या पथकानं आतापर्यंत ढिगाऱ्या खालून काही जणांना बाहेर काढलं असून जवळपास 13 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींपैकी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 3 विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे.