ETV Bharat / bharat

कोलकात्यात तृणमूल-भाजप कार्यकर्ते भिडले.. अमित शाहांच्या रॅलीत दगडफेक व जाळपोळ

रोड शो दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाह यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी दगडफेकीच्या घटना घडल्या.

author img

By

Published : May 14, 2019, 7:47 PM IST

Updated : May 14, 2019, 8:27 PM IST

कोलकात्यामधील अमित शाहांच्या रोडशोमध्ये जाळपोळ

कोलकाता - भाजप व तृणमूल काँग्रेस यांच्यात संघर्ष तीव्र झाल्याचे दिसत आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या कोलकाता येथील रोड शो दरम्यान जाळपोळीच्या घटना घडल्या. या राड्यामुळे रोड शो थांबवण्यात आला.

अमित शाह यांच्या रोडशोच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांचे पोस्टर्स काढून टाकण्यात आले होते. पोस्टर्स फाडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोड शो दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शाह यांना काळे झेंडे दाखवले. यावेळी दगडफेकीच्या घटना घडल्या. अमित शाह यांच्या रॅलीमध्ये झालेल्या संघर्षात ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली.

Amit Shah, roadshow,  Kolkata, clashes, broke out, कोलकाता, अमित शाह, रोडशो, जाळपोळ,
ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली.

अमित शाह यांचा ताफा बिधान सराई येथील महाविद्यालयाच्या वसतीगृहापासून जात होता. अमित शाह ज्या ट्रकवर होते त्या ट्रकच्या दिशेने काठ्या फेकण्यात आल्या.

अमित शाह यांची रॅली सुरु आयोजित कण्यापुर्वीच कोलकातामधील वातावरण तापले होते. शाह यांच्या रॅलीला पश्चिम बंगालच्या प्रशासनाने परवानगी नाकारली होती. शाह यांनी रॅली काढणार असा निर्धार केला होता. मागील लोकसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले होते. मोदी लाट असताना देखिल त्यांच्या पक्षाचे ३३ खासदार निवडूण आले होते. यंदाच्या निवडणुकित भाजपने बंगालमध्ये जास्तीत-जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला असून या पार्श्वभूमीवर बंगालकडे विशेष लक्ष दिले आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 14, 2019, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.