ETV Bharat / bharat

अमित शाहंचा उमेदवारी अर्ज दाखल; जेटली, राजनाथ सिंहांसह अनेकांची उपस्थिती - भाजप

राजकारणातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आत्तापर्यंत या मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. १९८९ पासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. अडवाणींनंतर आता अमित शाह येथे आपले भविष्य आजमावणार आहेत.

अमित शाह & उद्धव ठाकरे
author img

By

Published : Mar 30, 2019, 8:43 AM IST

Updated : Mar 30, 2019, 3:32 PM IST

गांधीनगर - भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज गुजरातच्या गांधीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी तसेच एनडीए पक्षातील इतर नेते यावेळी उपस्थित होती. पंतप्रधान मोदी नंतर देशातील दुसरे मोठे नेते म्हणून अमित शाहंकडे पाहिले जात आहे. मला वडिलांनी प्रत्येक काम मनापासून करायला शिकवले आहे. मी याठिकाणी अमित शाहंना शुभेच्छा द्यायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले. आता संपूर्ण देशात भगवा फडकणार असल्याचेही उद्धव यांनी सांगितले.

२३ वर्षापासून गांधीनगरवर भाजपचा ताबा -

राजकारणातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आत्तापर्यंत या मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. १९८९ पासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. त्यावेळी भाजपचे कट्टर नेते शंकर सिंह बघेला येथून निवडणूक जिंकले होते. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर सलग ६ वेळा त्यांनी येथून निवडणूक जिंकलेली आहे. आडवाणी नंतर आता अमित शाह येथे आपले भविष्य आजमावणार आहेत.

अमित शाहांना विश्वास आहे, की या मतदार संघातून आपणच निवडून येणार. या मतदार संघातून निवडणूक लढवली तर आपण जुन्या नेत्यांच्या रांगेत येणार, असेही अमित शाहांना वाटते. शाह यांनी या मतदार संघासाठी कठोर मेहनत घेतली आहे. येथून अटलबिहारी वाजपेयी यांनीही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अमित शाह येथून निवडणूक जिंकले तर, पक्षामध्ये त्यांचा दर्जा अधिकच वाढेल.

अमित शाहांनी या मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे ठरवल्यानंतर पक्षामध्ये अंतर्कलह सुरू झालेले दिसतात. आडवाणींना पक्षाने चक्क रामराम ठोकल्याचे दिसत आहे. एके काळी भाजपची धुरा सांभाळणारे आडवाणी यावेळी निवडणूक लढवत नसल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज दिसत आहेत.

Intro:Body:

अमित शाह आज उमेदवारी अर्ज दाखल करणार; उद्धव ठाकरेंची हजेरी

गांधीनगर - भाजप अध्यक्ष अमित शाह आज गुजरातच्या गांधीनगर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी तसेच एनडीए पक्षातील इतर नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी नंतर देशातील दुसरे मोठे नेते म्हणून अमित शाहांकडे पाहिले जात आहे.

२३ वर्षापासून गांधीनगरवर भाजपचा ताबा

राजकारणातील भाजपच्या दिग्गज नेत्यांनी आत्तापर्यंत या मतदार संघातून निवडणूक लढवली आहे. १९८९ पासून ही जागा भाजपच्या ताब्यात आहे. त्यावेळी भाजपचे कट्टर नेते शंकर सिंह बघेला येथून निवडणूक जिंकले होते. १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. त्यानंतर सलग ६ वेळा त्यांनी येथून निवडणूक जिंकलेली आहे. आडवाणी नंतर आता अमित शाह येथे आपले भविष्य आजमावणार आहेत.

अमित शाहांना विश्वास आहे, की या मतदार संघातून आपणच निवडून येणार. या मतदार संघातून निवडणूक लढवली तर आपण जुन्या नेत्यांच्या रांगेत येणार, असेही अमित शाहांना वाटते. शाह यांनी या मतदार संघासाठी कठोर मेहनत घेतली आहे. येथून अटलबिहारी वाजपेयी यांनीही निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे अमित शाह येथून निवडणूक जिंकले तर, पक्षामध्ये त्यांचा दर्जा अधिकच वाढेल.

अमित शाहांनी या मतदार संघातून निवडणूक लढवण्याचे ठरवल्यानंतर पक्षामध्ये अंतर्कलह सुरू झालेले दिसतात. आडवाणींना पक्षाने चक्क रामराम ठोकल्याचे दिसत आहे. एके काळी भाजपची धुरा सांभाळणारे आडवाणी यावेळी निवडणूक लढवत नसल्यामुळे त्यांचे समर्थक नाराज दिसत आहेत.

Conclusion:
Last Updated : Mar 30, 2019, 3:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.