ETV Bharat / bharat

घुसखोर तुमचे चुलत भाऊ लागतात का?, अमित शाहंचा राहुल गांधींवर हल्लाबोल

author img

By

Published : Dec 2, 2019, 5:40 PM IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

अमित शाहचा राहुल गांधींवर हल्लाबोल
अमित शाहचा राहुल गांधींवर हल्लाबोल

रांची - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. घुसखोर तुमचे चुलत भाऊ आहेत का?, असा सवाल करत राम मंदीरावरूनही त्यांनी काँग्रेसवर टीका केली. झारखंडमधील रांची येथील सभेला ते संबोधीत करत होते.

  • #WATCH Home Min Amit Shah: Ye Rahul baba kehte hain ki NRC kyun la rahe ho?Ghuspetiyon ko kyun nikal rahe ho? Kahan jaenge,kya kahenge? Kyun bhai aapke chachere bhai lagte hain kya? 2024 ke pehle desh se ek-ek ghuspetiyon ko chun-chun kar nikalne ka kaam BJP sarkar karne wali hai pic.twitter.com/jEY2bqpJpQ

    — ANI (@ANI) December 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आम्ही अवैधरित्या भारतात राहणाऱ्या स्थलांतरितांबाबत बोलतो तेव्हा राहुल बाबा म्हणतात, की तुम्ही त्यांना कुठे पाठवणार, ते कुठे जाणार, काय खाणार? माझा काँग्रेसला सवाल आहे, की ते तुमचे चुलत भाऊ लागतात का ? , असे अमित शाह प्रचारसभेत म्हणाले. 2024 पर्यंत 'एक ना एक' घुसखोरास पकडून देशाबाहेर काढणार असल्याचं शाह म्हणाले.

अयोध्या राम मंदीर प्रकरण न्यायालयात नेण्याची गरज नाही, अशी भूमिका काँग्रेसने घेतली. मात्र, आम्ही न्यायालयात हे प्रकरण नेले आणि आता परिणाम तुमच्या समोर आहे. सर्वोच्च न्यायालयाने अयोध्यामध्ये राम मंदीर उभारण्याचा निर्णय दिला आहे, असे शाह म्हणाले.

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यात 7 डिसेंबरला 20 जागांवर मतदान होत आहे.

Intro:Body:

DFD

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.