ETV Bharat / bharat

कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना कितीतरी पट फायदा; कर्नाटकात अमित शाहांचे प्रतिपादन - अमित शाह कर्नाटक काँग्रेस टीका

"नरेंद्र मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कित्येक पटींनी वाढेल. या कायद्यांमुळे शेतकरी आपला माल देशात आणि जगभरात कुठेही विकू शकेल", असे शाह म्हणाले.

Amit Shah on Farm Laws and Congress in Karnataka visit
कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना कितीतरी पट फायदा; कर्नाटकात अमित शाहांचे प्रतिपादन
author img

By

Published : Jan 17, 2021, 7:27 PM IST

बंगळुरू : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या कर्नाटक दौऱ्याचा आज दुसरा दिवस होता. यावेळी जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कितीतरी पटींनी वाढेल, असे शाह यावेळी म्हणाले.

"नरेंद्र मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कित्येक पटींनी वाढेल. या कायद्यांमुळे शेतकरी आपला माल देशात आणि जगभरात कुठेही विकू शकेल", असे शाह म्हणाले.

काँग्रेसवरही साधला निशाणा..

काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही शाहांनी यावेळी केला. काँग्रेसला शेतकऱ्यांची एवढीच काळजी होती, तर सत्तेत असताना त्यांनी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये का नाहीत दिले? किंवा मग पंतप्रधान कृषी विमा योजना का नाही लागू केली? किंवा इथेनॉल पॉलिसीबाबतही काही निर्णय का नाही घेतला? तुम्ही हे केले नाही, कारण तुमचा हेतूच योग्य नव्हता.

मागील सरकारने आपल्या एकूण अर्थसंकल्पापैकी शेतीसाठी केवळ २१ हजार कोटी रुपये शेतीसाठी दिले होते. आमच्या अर्थसंकल्पात ही रक्कम १.३४ लाख कोटी करण्यात आली आहे. यासोबतच किसान सन्मान योजनेमधून नऊ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १.१३ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे, असे शाह म्हणाले.

अंगडी यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट..

आपल्या दौऱ्यामध्ये अमित शाहांनी दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा हेदेखील उपस्थित होते. शाहांनी अंगडी यांच्या प्रतिमेला फुले वाहत, कुटुंबीयांचे सांत्वन केले.

विविध प्रकल्पांचे उद्घाटन..

आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये अमित शाहांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. बागलकोट जिल्ह्यातील केदारनाथ शुगर अँड अ‌ॅग्रो प्रोडक्ट्स लिमिटेडमध्ये इथेनॉल प्रकल्पाचे त्यांनी उद्घाटन केले. शनिवारी त्यांनी शिवमोग्गामध्ये भद्रावती रॅपिड अ‌ॅक्शन फोर्स सेंटरच्या पायाभरणी कार्यक्रमास हजेरी लावली होती. यासोबतच, रविवारी त्यांनी बागलकोट येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. तसेच, भाजपा जनसेवा कार्यक्रमालाही उपस्थिती दर्शवली.

हेही वाचा : काँग्रेस-डाव्यांमध्ये कोणताही गैरसमज नाही; बंगाल विधानसभा निवडणूक एकत्रच लढवणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.