ETV Bharat / bharat

कोरोनाच्या प्रसारामुळे मोदींची परदेशवारी पुढे ढकलली; युरोपीय संघाच्या परिषदेला राहणार होते उपस्थित

author img

By

Published : Mar 5, 2020, 5:55 PM IST

युरोपीयन संघ परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार होते. मात्र, दोन्ही देशाच्या आरोग्य विभागांनी अशा परिस्थितीत प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या सहमतीने परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.

convid 19
परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविश कुमार माहिती देताना

नवी दिल्ली - चीनमध्ये थैमान घातेलेल्या कोरोना विषाणूचा जगभरामध्ये प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे. इराण, इटलीसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढत आहे. भारतातही ३० रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींचा युरोप दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. युरोपीयन संघाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मोदी बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सला जाणार होते. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे ही परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.

  • Raveesh Kumar, MEA: As far as India-EU Summit is concerned which PM Modi had to attend, the health authorities of both the countries suggested that travelling must not take place at present. So, it has been decided that Summit will be rescheduled on a mutually convenient date. pic.twitter.com/ks8YtDbfZ3

    — ANI (@ANI) March 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - इराणमध्ये आज भारतीय वैद्यकीय पथक पहिले आरोग्यकेंद्र उभारेल, परराष्ट्रमंत्र्यांची माहिती..

'युरोपीयन संघ परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार होते. मात्र, दोन्ही देशाच्या आरोग्य विभागांनी अशा परिस्थितीत प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे दोन्ही देशांच्या सहमतीने परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. युरोपीयन संघ आणि भारत जागतिक आरोग्याबाबत कटिबद्ध आहेत. लवकरच कोरोना विषाणूचा प्रसार थांबेल. युरोपीयन संघ आणि भारताच्या सौदार्हपूर्ण संबधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे', असे परराष्ट खात्याचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा - पाचवीपर्यंतच्या सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद, कोरोनाच्या प्रसासामुळे दिल्ली सरकारचा निर्णय

कोरोना विषाणूमुळे इराणमध्ये १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्येही मृतांचा आकडा वाढत आहे. चीनमध्ये ३ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आशियायी देशांमध्येही कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.