ETV Bharat / bharat

'बम बम भोले'च्या जयघोषाने सुरू झाली अमरनाथ यात्रा; कडेकोट बंदोबस्त

हिंदूंसाठी पवित्र स्थळ असणाऱ्या अमरनाथ गुहेच्या दर्शनासाठी जम्मू काश्मीरच्या बालटाल बेस कँपपासून भाविकांचा पहिला जत्था रवाना झाला आहे.

author img

By

Published : Jul 1, 2019, 12:15 PM IST

अमरनाथ येथील शिवलिंग

श्रीनगर - हिंदूंसाठी पवित्र स्थळ असणाऱ्या अमरनाथ गुहेच्या दर्शनासाठी जम्मू काश्मीरच्या बालटाल बेस कँपपासून भाविकांचा पहिला जत्था रवाना झाला आहे. रविवारी जम्मूमध्ये झालेल्या स्वागतानंतर भाविकांचा जत्था काश्मीरसाठी रवाना झाला होता. ४५ दिवस चालणारी अमरनाथ यात्रा सोमवारी आौपचारिकरित्या सुरू झाली. १५ ऑगस्टला श्रावण पौर्णिमेच्या दिवशी यात्रेचा समारोप होईल.

'बम बम भोले'चा जयघोष करत २ हजार २३४ भाविकांचा जत्था आधार शिबिरपासून रविवारी यात्रेसाठी निघाला होता. आतापर्यंत देशभरातील दीड लाख भाविकांनी ४५ दिवस चालणाऱ्या यात्रेसाठी नोंदणी केली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील ३६ किलोमीटर आणि गांदेरबल जिल्ह्यातील १४ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर भाविकांना अमरनाथ गुहेचे दर्शन होईल. राज्यपालांचे सल्लागार के. के. शर्मा यांनी यात्रेकरुंच्या ९३ वाहनांना भगवती नगर आधार शिबिरपासून निरोप दिला. भाविकांच्या शांतिपूर्ण प्रवासासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या गेल्या आहेत, असे शर्मा म्हणाले.

भाविकांचा जत्था १७ लहान मुलांसह यात्रेसाठी निघाला आहे. नूनवां-पहलगम आणि बालटाल आधार शिबिर येथे भाविकांचा पुढचा मुक्काम असेल. अमरनाथ गुहेपर्यंत पोहचण्यासाठी २ मार्गांचा उपयोग केला जातो. यातील एक पारंपरिक मार्ग असून या मार्गाने १३० महिला, ७ लहान मुले आणि ४५ साधूंसोबत १ हजार २२८ भाविकांचा जत्था निघाला आहे. तर दुसऱ्या मार्गाने २०३ महिला आणि १० लहान मुलांसोबत १ हजार ६ भाविक यात्रा करत आहेत.

अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक दिलबाग सिंह यांनी रविवारी श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेचा आढावा घेतला. ४५ दिवसांनी रक्षाबंधनच्या दिवशी संपणाऱ्या यात्रेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

दिलबाग सिंह यांनी सुरक्षेच्या दृष्टीने अनेक ठिकाणांची पाहणी केली. वॉलनट फॅक्टरी, मीर बाजार आणि पंथा चौक याठिकाणी उभारण्यात आलेल्या शिबिरांना भेट देत त्यांनी यात्रेकरुंशी संवाद साधला.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.