ETV Bharat / bharat

जाणून घ्या... काय आहे अमरनाथ यात्रा ! - पेहेलगाम

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. त्यामुळे यात्रेकरुंच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून, यात्रेकरूंना लवकरात लवकर परतण्यास सांगितले आहे. नक्की काय आहे अमरनाथ यात्रा याबद्दल जाणून घेऊ...

यात्रेकरुच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून, यात्रेकरूंना लवकरात लवकर परतण्यास सांगितले आहे.
author img

By

Published : Aug 2, 2019, 10:43 PM IST

अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. त्यामुळे यात्रेकरुच्या सुरक्षेच्या दृष्टीने अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली असून, यात्रेकरूंना लवकरात लवकर परतण्यास सांगितले आहे. याआधीही दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेला लक्ष्य केले होते.
नक्की काय आहे अमरनाथ यात्रा...

काय आहे अमरनाथ यात्रा ?

हिंदू धर्मात अमरनाथ यात्रा करणे हा मोक्ष प्राप्तीचा मार्ग समजला जातो. अमरनाथ येथील गुहेत भगवान शिव यांनी पार्वतीला अमरकथा सांगितल्याची आख्यायिका असल्याने या क्षेत्राला अमरनाथ हे नाव पडले. श्रावण पौर्णिमेला हा प्रसंग घडल्याने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
जम्मू-काश्मीरच्या पेहेलगाम पासून सुरु होणारी यात्रा समुद्र सपाटीपासून ३८०० मीटर उंच असलेल्या अमरनाथ मंदिरापाशी संपते. भ्रीगू नामक ऋषींनी या तीर्थस्थळाचा सर्वप्रथम शोध लावल्याचे सांगितले जाते.

जाणून घेऊया अमरनाथ यात्रेबद्दल

5000 वर्षे जुने मंदिर

हे मंदिर म्हणजे 19 मीटर उंचीची गुहा आहे. ही गुहा ५००० वर्षे जुनी असल्याचे मानले जाते. यामध्येच भगवान शंकराने अमरकथा सांगितल्याचे वर्णन हिंदू धर्म ग्रंथात आहे. अमरनाथ हे हिंदू धर्मातील ५१ शक्तिपीठांपैकी एक देवस्थान आहे.

किती किलो मीटरची आहे अमरनाथ यात्रा?

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरपासून सुरु होऊन ते पेहेलगाम आणि चंदनवाडीमार्गे शेषनाग-पंचतर्णी पर्यंतचा हा प्रवास १४१ किलो मीटरचा आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने हिंदू भाविक अमरनाथ यात्रेला उपस्थिती लावतात. जवळपास ४५ दिवस चालणारी यात्रा रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजेच हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी संपते. या काळात येथील गुहांमध्ये बर्फाच्या आकाराचे शिवलिंग तयार होतात. हिंदू भाविकांमध्ये या बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी लोटलेली असते.

किती दिवस चालते यात्रा ?
यंदा जवळपास ४६ दिवस यात्रा चालणार आहे. जुलैपासून सुरु झालेल्या यात्रेचा समारोप १५ ऑगस्टला होणार आहे. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग आणि गंदेर्बल जिल्ह्यातून जाणाऱ्या या मार्गांवर कडेकोट सुरक्षा असते.

चार वेळेस केले यात्रेला लक्ष्य
अमरनाथ यात्रेवर सतत अतेरिकी हल्ल्याचे सावट असते. या वर्षी यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी ४०,००० पॅरामिलिटरी कमांडो चा बंदोबस्त केंद्रीय सरकारने केला आहे. २००० साली या यात्रेवरील सगळ्यात मोठा लष्करी हल्ला झाला होता. यामध्ये तब्बल भाविकांना आपला जीव गमवावा लागला. याशिवाय २००१, २००२, २००६, २०१७ मध्येही अतेरीक्यांनी भाविकांना लक्ष्य केले होते.

दरवर्षी यात्रेनिमित्त जवळपास सहा लाख भाविक उपस्थित असतात.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.