जम्मू - यावर्षीची अमरनाथ यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहे. हिमालयीन पर्वतरांगेत चालणारी ही यात्रा २१ जुलै ते ३ ऑगस्ट अशी एकूण १५ दिवस सुरू राहणार आहे. श्री अमरनाथजी श्राईन बोर्डाच्या वतीने याची माहिती देण्यात आली आहे. जम्मूच्या अनंतनाग जिल्ह्यात समुद्रसपाटी पासून ३८८० मीटर उंचीवरील अमरनाथ गुहा मंदिरात या यात्रेचे आयोजन केले जाते. यंदाच्या यात्रेची प्रथम पूजा शुक्रवारी संपन्न झाली. त्यावेळी अमरनाथ यात्रा बोर्डाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
कोरोना महामारीमुळे यावर्षी ही यात्रा १५ दिवसाची ठेवण्यात आली आहे, तसेच या १५ दिवसाच्या यात्रेत साधू व्यतिरिक्त ५५ वर्षाच्या आतील यात्रेकरूंनाचा परवानगी मिळेल. तसेच या यात्रेकरूंना कोरोना निगेटिव्ह असे प्रमाणपत्र गरजेचे आहे.
यात्रेत सहभागी जम्मू प्रवेशावेळी कोरोना तपासणी संदर्भात क्रॉस चेक करण्यात येणार असल्याची माहिती अमरनाथ बोर्डाकडून देण्यात आली आहे. साधुसंता व्यतीरिक्त सर्व यात्रेकरुंना यात्रेसाठी ऑनलाईन नोंदणी बंधनकारक करण्यात आले आहे. त्याच बरोबर १५ दिवसाच्या या यात्रा कालावधीत गुफा मंदिरात सकाळ-संध्याकाळ होणारी आरती आणि पूजेचे देशभरातील भक्तांसाठी थेट प्रेक्षपण केले जाईल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या या ठिकाणी स्थानिक रोजगारी उपलब्ध होत नसल्याने कॅम्प मधून गुहामंदिरापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता निर्मितीस अडथळे निर्माण झाले होते. त्यामुळे यावेळी गांदरबल जिल्ह्यातील बालटाल बेस कॅम्पासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जाईल, अशी ही माहिती प्रशासनकडून देण्यात आली आहे. ही यात्रा ३ ऑगस्टला संपन्न होणार आहे.