अयोध्या - उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येतील अस्थायी राम मंदिराचे पुजारी आणि कर्मचाऱ्यांचा भत्ता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्या मंडलायुक्त मनोज मिश्रा यांनी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांना भत्ता वाढविण्याचे आश्वासन दिले आहे.
आचार्य सत्येंद्र दास मिळणाऱ्या भत्त्यासंदर्भात नाराजी व्यक्त करण्यासाठी मिश्रा यांना भेटले होते. यावर मिश्रा यांनी, मंदिरात पूजा केल्यानंतर जो प्रसादा दाखविला जातो, त्यासाठी दिला जाणारा वार्षिक भत्ता, वाढविला जाईल, असे म्हटले आहे.
यापूर्वी, आचार्य सत्येंद्र दास यांनी नऊ सदस्यीय कर्मचाऱ्यांच्या वार्षिक भत्त्यात झालेल्या वाढीवर नाराजी व्यक्त केली होती. मुख्य पूजारी सत्येंद्र दास यांच्या भत्त्यात 1,000 रुपये प्रतिमाहिना, तर उर्वरित आठ सदस्यांना मिळणाऱ्या भत्त्यात 500 रुपये प्रतिमाहिना वाढ केली होती. तसेच प्रसादासाठी 800 रुपये प्रतिमाहिना वृद्धि केली होती.