ETV Bharat / bharat

दिल्लीतील सर्व हॉटेल 8 जूनला उघडणार! थकीत बिले, परवाना नूतनीकरणाबाबत हॉटेल मालक चिंतेत - दिल्ली हॉटेल बातमी

दिल्लीमध्ये 8 जूनपासून सरकारने सर्व हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण येणार्‍या काळात हॉटेल पूर्वीप्रमाणे चालणार नाही, अशी माहिती हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष जगप्रीत अरोरा यांनी दिली.

Hotel Association President Jagpreet Arora
हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष जगप्रीत अरोरा
author img

By

Published : Jun 5, 2020, 5:32 PM IST

नवी दिल्ली- कोरोना साथीच्या आजाराचा परिणाम प्रत्येक व्यवसायावर झाला आहे. मात्र, या साथीमुळे हॉटेल उद्योग पूर्णपणे ठप्प झाला. कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तरी देखील लॉकडाऊनच्या काळात विविध प्रकारची बिले आल्याने हॉटेल मालक चिंतेत पडले आहेत. दरम्यान, अनलॉक केलेला पहिल्या टप्प्याअंतर्गत आता राजधानीतील सर्व हॉटेल्स सुरू करण्याची सरकारने परवानगी दिली आहे.

हॉटेल उघडल्यानंतरही व्यवसाय चालू ठेवण्याची कोणतीही आशा नाही. अर्थातच 8 जूनपासून सरकारने सर्व हॉटेल्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण येणार्‍या काळात हॉटेल पूर्वी प्रमाणे चालणार नाही. मार्चपासून हॉटेल पूर्णपणे बंद आहेत. आमचे कर्मचारीही आपापल्या गावी गेले आहेत. मात्र, असे असूनही आम्हाला दरमहिन्याला वीज बील, घर कर, कर्मचाऱ्यांचा पगार आणि बरीच लाखांची बिले मिळत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही हे समजण्यास अक्षम आहोत, की या साथीच्या रोगाने आम्ही आपल्या कुटुंबाला किंवा कामगारांना पगार द्यावा की थकबाकी द्यावी? आमच्यावर चारही बाजूंनी संकट ओढवले आहे, अशी माहिती हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष जगप्रीत अरोरा यांनी दिली.

अरोरा यांनी ईटीव्ही भारतच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली, की दरवर्षी त्यांना हॉटेल परवाना नूतनीकरण करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे यावेळी तरी सरकारने आम्हाला मदत केली पाहिजे. या साथीच्या रोगात सरकारने सर्व हॉटेल्सचे परवाने स्वयंचलितपणे द्यावेत. यासाठी आम्ही दिल्लीचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे वारंवार मागणी केली आहे. मात्र, आम्हाला कोणीही प्रतिसाद दिला नाही, अशी माहिती त्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.